
आपल्या देशात राहणाऱ्या लोकांचा पोलिसांवर प्रचंड विश्वास असतो. ते प्रत्येक अडचणीच्या वेळी पोलिसांवर विश्वास ठेवून त्यांची मदत घेतात. पण अशाच एका पोलीस अधिकाऱ्याने लोकांचा विश्वास घात केला आहे. या आपीएस अधिकाऱ्याने महिलांसोबत केलेल्या अश्लील चाळ्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त करत कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानंतर त्यांच्या लेकीची चर्चा सुरु आहे. तिने देखील विमानतळावर धक्कादायक गोष्टी केल्या आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये कर्नाकटमधील पोलिस महासंचालक (डीजीपी) रँकचे आयपीएस अधिकारी रामचंद्र राव आहेत. त्यांची मुलगी तारा रान्या राव ही काही दिवसांपूर्वी चर्चेत होती. कन्नड चित्रपटसृष्टीतील चमकणारी तारा रान्या राव एक यशस्वी अभिनेत्री ते तस्कर असा प्रवास केवळ मनोरंजन जगताला हादरवून टाकला नाही, तर कायद्यावरही प्रश्न उपस्थित करणारा होता.
रान्या राव कोण आहेत?
रान्या राव, कन्नड आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील एक उगवती अभिनेत्री आहेत. २०१४ मध्ये कन्नड चित्रपट ‘माणिक्य’ मधून डेब्यू केलेल्या रान्याने ‘पटकी’ आणि ‘वाघा’सारख्या चित्रपटांमध्ये आपली जागा निर्माण केली. तिचे सौंदर्य आणि अभिनय यामुळे चाहते वेडे झाले. पण रान्याची कौटुंबिक पार्श्वभूमीही कमी रोचक नाही. ती कर्नाटक राज्य पोलिस हाउसिंग कॉर्पोरेशनच्या डीजीपी के. रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. रामचंद्र राव हे ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची पहिली पत्नी रान्याची आई आहे. रान्या यांनी स्वतःला यशस्वी मॉडेल आणि अभिनेत्री बनवले. तिची नेटवर्थ सुमारे ५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. तिने चित्रपट, जाहिराती आणि सोशल मीडियातून ही कमाई केली आहे.
कर्नाटक के DGP साहब अपने राज्य में महिला सशक्तिकरण को आगे बढ़ाते हुए ।🤡
बस ये समझ नहीं आ रहा है वीडियोग्राफी के लिए अपना स्टाफ बैठा रखा था या AI बता दिया जाएगा । pic.twitter.com/E61K574iY8
— खुरापात (@KHURAPATT) January 19, 2026
रान्याचे संपूर्ण प्रकरण काय आहे?
कहाणीची सुरुवात मार्च २०२५ पासून होते. ३ मार्च रोजी रान्या दुबईहून बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. सुमारे ६ वाजता रान्या एक्झिट गेटकडे निघाली. बाहेर पडण्यासाठी ती ग्रीन चॅनेलकडे गेली. ग्रीन चॅनेल हे त्या प्रवाशांसाठी असते ज्यांच्याकडे तपासणीसाठी कोणतीही वस्तू नसते. रान्या यापूर्वीही असेच विमानतळावरून बाहेर पडत होती. त्या दिवशी DRI च्या अधिकाऱ्यांनी तिला थांबवले. विचारले – तुमच्याकडे सोने किंवा अशी कोणतीही गोष्ट आहे का जी सांगावी लागेल? रान्या यांनी उत्तर दिले – नाही.
रान्याकडून १४.२ किलोग्रॅम सोने जप्त
इतक्या छोट्या संभाषणात रान्याच्या चेहऱ्यावर भीती दिसू लागली. अधिकाऱ्यांना शंका आली. त्यांनी दोन महिला अधिकाऱ्यांना बोलावले आणि रान्याची तपासणी करण्यास सांगितले. जेव्हा तिची तपासणी केली तेव्हा तिच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागात सोने सापडले. तिच्याकडून एकूण १४.२ किलोग्रॅम सोने जप्त झाले, ज्याची किंमत सुमारे १२.५६ कोटी रुपये होती. त्यानंतर रान्याला अटक करण्यात आली.