मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, शेवटी इराणने गुडघे टेकवले, थेट अमेरिकेला…

मोठी बातमी समोर येत आहे, इराण आणि अमेरिकेमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोठा संघर्ष पहायला मिळत आहे, मात्र आता इराणने माघार घेतली आहे. इराणकडून अमेरिकेला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, शेवटी इराणने गुडघे टेकवले, थेट अमेरिकेला...
pezeshkian
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 27, 2026 | 10:20 PM

अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला आहे, मात्र तरी देखील स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये अजूनही तणाव कायम आहे. एकीकडे युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केला आहे, तर दुसरीकडे अमेरिकेनं देखील या मार्गावर नाकेबंदी केली आहे. मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे. इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मूज पुन्हा सुरू करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. आपल्या अणुकार्यक्रमाशी संबंधित कोणत्याही चर्चेत सहभागी न होताच, होर्मूजवरील नाकेबंदी उठवण्यासंबंधी इराणकडून अमेरिकेला प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सध्या इराणचे परराष्ट्र मंत्री रशियाच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये आता रशिया मध्यस्थी करण्याची शक्यता आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री रशियाच्या दौऱ्यावर आहेत, याचवेळी इरणकडून अमेरिकेला हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. नाव न सांगण्याच्या आटीवर इराण आणि रशियाच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे, एवढंच नाही तर अमेरिकेने आमच्यावर लावलेले प्रतिबंध देखील उठवावेत असं देखील इराणने आपल्या या प्रस्तावात म्हटलं आहे.

इराणने प्रस्ताव का पाठवला

अमेरिकेनं इराणची पूर्णपणे आर्थिक कोंडी केली आहे. इराणची अर्थव्यवस्था पूर्णपणे डबघाईला आली आहे. जर नाकेबंदी अशीच कायम राहिली तर इराणची अर्थवव्यस्था आता जास्तीत जास्त ऑगस्ट 2026 पर्यंत दबाव सहन करू शकते, त्यामुळे सध्या इराण प्रचंड दबावाखाली आहे. जर ऑगस्ट 2026 नंतरही अमेरिकेनं स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये नाकेबंदी कायम ठेवली तर मात्र इराण मोठ्या संकटात सापडणार आहे. त्यामुळे आता आपली अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी इराणकडून अमेरिकेला प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे इराणमधून होणाऱ्या कच्च्या तेलाची निर्यात मोठ्या संकटात सापडली आहे.

इराणपुढे अजूनही एक मोठं संकट आहे, अमेरिकेनं केलेल्या नाकेबंदीमुळे इरानमधून होणारी कच्च्या तेलाची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे पुढील दहा ते बारा दिवसांमध्ये त्यांच्या देशातील कच्च्या तेलाचे सर्व साठे फूल्ल होणार आहेत. त्यानंतर इराणला कच्च्या तेलाचं उत्पादन थांबवावं लागणार आहे. त्यामुळे इराणंच मोठं नुकसान होऊ शकतं, त्यासाठी आता इराणकडून अमेरिकेला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

 

Follow Us