मोठी बातमी! इराणकडून भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूचा खात्मा, अख्खी टीमच संपवली, एकही शिल्लक राहिला नाही

इराणमध्ये सध्या प्रचंड तणाव आहे. अमेरिकेकडून स्ट्रेट ऑफ होर्मूजची नाकेबंदी करण्यात आली आहे. मात्र असं असतानाही इराणमधून भारतासाठी मोठी गुड न्यूज समोर आली आहे. इराणने भारताच्या शत्रूचा खात्मा केला आहे.

मोठी बातमी! इराणकडून भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूचा खात्मा, अख्खी टीमच संपवली, एकही शिल्लक राहिला नाही
pezeshkian
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 23, 2026 | 11:55 AM

अमेरिका आणि इराणमध्ये तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांकडून स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्यात आला आहे. दोन्ही देश स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये आमने-सामने आहेत. दरम्यान स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे संपूर्ण जगावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. याचा भारताला देखील सर्वाधिक फटका बसला आहे. मात्र आता इराणमधून भारतासाठी सर्वात मोठी गुड न्यूज समोर आली आहे. इराणकडून भारताच्या शत्रूंचा खात्मा करण्यात आला आहे. इराणने आख्खी टीमच संपवली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार इराणच्या सुरक्षा दलाने पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतातील रास्क क्षेत्रात मोठी कारवाई केली आहे. इराणने जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण ऑपरेशन टीमचा खात्मा केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार हे सर्व दहशतवादी पाकिस्तानची सीमा ओलांडून इराणमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात होते. याचदरम्यान इराणने सैन्य कारवाई करत या संघटनेतील अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवाद्यांच्या या गटाला इराणमध्ये जैश अल-जुल्म नावाने ओळखलं जातं. दरम्यान इराणकडून या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्यामुळे आता इराण आणि पाकिस्तानमधील सीमावाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे.

इराणच्या सस्नीम वृत्तसंस्थेच्या एका रिपोर्टनुसार हा दहशतवाद्यांचा गट पाकिस्तानच्या बलूचिस्तानमध्ये असलेल्या रास्क परिसरातील पाकिस्तान इराण सीमा पार करुण इराणमध्ये घुसण्याच्या तयारीमध्ये होता. त्याचवेळी इराणने मोठी सैन्य कारवाई केली. यामध्ये अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. या दहशतवादी संघटनेचं थेट पाकिस्तानच्या आएसआयशी कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. ही दहशतवादी संघटना आएसआयसाठी काम करते. दरम्यान याच दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी 2016 साली भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांचं इराणमधून अपहरण केलं होतं, त्यांना पाकिस्तानमध्ये नेण्यात आलं. कुलभूषण जाधव अजूनही पाकिस्तानच्या जेलमध्येच आहेत. या दहशतवाद्यांकडून वारंवार इराणच्या सैन्य दलावर तसेच सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांवर देखील हल्ले करण्यात आले आहेत. हे दहशतवादी वारंवार इराणमध्ये घुसखोरी करून, तेथील नागरिकांवर हल्ले करत असतात.

 

Follow Us