
जेव्हा आपण महागड्या वस्तुंबाबत बोलतो, तेव्हा सामान्यपणे आपल्या डोक्यात कोणता विचार येतो? महागडी वस्तू म्हटलं की आपण, कार, सोन्या-चांदीचे दागिने, घर किंवा हिऱ्यांचे दागिने अशा वस्तुंबाबत विचार करतो. मात्र तुम्हाला हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल, जपानमध्ये असं एक फळ आहे, ज्याची किंमत एका नव्या कोऱ्या कारपेक्षाही अधिक आहे. ज्याचं नाव आहे, युबारी किंग मेलन, याचं उत्पन्न हे फक्त जपानमध्येच घेतलं जातं, युबारी किंग मेलन हे जगातील सर्वात जास्त महाग (most expensive fruit in the world) फळ आहे. हे फळ एवढं महाग का आहे? या फळामध्ये असं काय आहे की, हे फळ एवढं महाग असून देखील लोक ते खरेदी करतात? त्याचं वैशिष्ट काय आहे? याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
काय आहे युबारी किंग मेलन?
हे फळ एक प्रकारचं खरबूज आहे. या फळाचं उत्पादन फक्त जपानमध्येच आणि ते पण जपानच्या होक्काइडो द्वीप परिसरामध्येच घेतलं जातं.हे एक साधं फळ नसून ते एक लक्झरी प्रोडक्ट आहे. हे फळ दिसण्यासाठी एकदम गोल असून, त्याचा वरचा भाग हा मेनचट असून,जाळीदार असतो. हे फळ आपल्या गोडपणासाठी ओळख जातं, हे फळ खूप गोड आहे.
काय आहे या फळाचं वैशिष्ट?
या फळाची उच्च किंमत हेच या फळाची स्पेशालिटी आहे. या फळाला विशिष्ट भौगोलिक ओळख देण्यात आली आहे. याचा अर्थ असा होतो की या फळाचं उत्पादन फक्त त्याच विशिष्ट प्रदेशामध्ये घेतलं जातं. जपानच्या ज्या प्रदेशात हे फळ घेतलं जातं तेथील माती ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झाली आहे, त्यामुळे इथे दिवसाचं तापमान आणि रात्रीचं तापमान यामध्ये फार फरक असतो, अशाच वातावरणामध्ये या फळाचं झाडं तग धरू शकतं.
कसं घेतलं जातं उत्पादन
हे फळ जगातील सर्वात महाग फळ असल्यामुळे याची शेती उघड्यावर केली जात नाही, तर या फळाचं उत्पादन बंदिस्त वातावरणात अतिशय नियंत्रित पद्धतीनं घेतलं जातं. योग्य वातावरण, पाणी आणि मातीची क्वॉलिटी या फळासाठी गरजेची असते, या फळाचं उत्पादन फारच थोडं असल्यामुळे त्याची किंमत प्रचंड आहे. या एका फळाची किंमत ही 33 ते 35 लाखांच्या आसपास आहे.