जम्मू काश्मिरमध्ये दारुगोळ्यासह दहशतवाद्याला घेतले ताब्यात, त्याने रचला होता मोठा कट….

| Updated on: Oct 30, 2022 | 8:31 PM

शोपियानमधील लष्कराचा सक्रिय दहशतवादी आदिल गनी दार याला रविवारी अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

जम्मू काश्मिरमध्ये दारुगोळ्यासह दहशतवाद्याला घेतले ताब्यात, त्याने रचला होता मोठा कट....
Follow us on

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमधील काही भागात दहशतवाद्यांच्या कारवायांमा ऊत आला आहे. त्यामुळे भारतीय जवानांकडूनही जोरदार शोध मोहीम सुरु केली गेली आहे. आजही शोपियान पोलिसांनी लष्कर-ए-तैयबाच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. शोपियानमधील लष्कराचा सक्रिय दहशतवादी आदिल गनी दार याला रविवारी अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला शोपियानमधील मोहंदपोरा येथून अटक करण्यात आली आहे.

दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ही अटक अशा वेळी झाली आहे जेव्हा भारतीय लष्कर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे.

भारतीय लष्कराकडून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधी जोरदार मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत लष्कराने गुरुवारी बारामुल्ला येथून लष्कराच्या एका दहशतवाद्याला अटक केली. पोलिसांसोबतच्या झालेल्या संयुक्त कारवाईत या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, कारवाईत एका दहशतवाद्याला ताब्यात घेतले असले तरी त्याच्याबरोबरच एक दहशतवादी फरार झाला आहे. सध्या त्याचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.

तर शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला, त्यावेळी भारतीय लष्काराने एका दहशतवाद्याचा खात्मा केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक जवानही जखमी झाला होता, उपचारादरम्यान त्या जवानाचा मृत्यू झाल्याचेही सांगण्यात आले.

भारतीय लष्कराने ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्याचे नाव निसार अहमद भट्ट असून तो स्थानिक पातळीवर लष्कराच्या दहशतवादी कारवाया करत होता.

त्याच्यासोबत उस्मान नावाचा पाकिस्तानी नागरिक काम करत होता, मात्र तो त्यावेळी फरार झाला होता. नुकतेच झालेल्या भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीचे आयोजन केले होते. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्याचं भारतानंसंयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या पॅनलला सांगितले होते.