JEE Main March Result 2021: जेईई मुख्य परीक्षा मार्च सत्राचा निकाल जाहीर, jeemain.nta.nic.in वर पाहा निकाल

| Updated on: Mar 24, 2021 | 11:52 PM

जेईई मेन परीक्षा मार्च (Jee Main March 2021 Result ) सत्राचा निकाल jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर जाहीर झाला आहे.

JEE Main March Result 2021: जेईई मुख्य परीक्षा मार्च सत्राचा निकाल जाहीर, jeemain.nta.nic.in वर पाहा निकाल
जेईई मेन मार्च उत्तरतालिका जाहीर
Follow us on

 JEE Main 2021 Exam Result Declared नवी दिल्ली: अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा समजली जाणाऱ्या जेईई मेन परीक्षा मार्च (Jee Main March 2021 Result declared) सत्राचा निकाल जाहीर झाला आहे. जेईई मेन परीक्षेच्या दुसऱ्या सत्राचा निकाल अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in वर जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थी या वेबसाईटला भेट देऊन त्यांचा निकाल तपासू शकतात. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल तपासण्यासाठी अर्ज क्रमांक आणि जन्मतारखेच्या सहाय्याने लॉग इन करावे लागेल. आता फक्त पेपर 1 चा निकाल जाहीर झाला आहे. दुसर्‍या सत्राच्या पेपर 1 साठी 6,19,638 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एनटीएच्या म्हणण्यानुसार या सत्रात 13 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. मंगळवारी जेईई मेन मार्च परीक्षेची अंतिम उत्तर पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली होती. (JEE Main Exam March Session Results Announced, View Results at jeemain.nta.nic.in)

असा चेक करा निकाल

स्टेप 1: विद्यार्थ्यांनी निकाल तपासण्यासाठी jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जावे.
स्टेप 2: वेबसाईटवर दिलेल्या जेईई मेन मार्चच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: आता नोंदणी क्रमांक आणि जन्मतारखेच्या मदतीने लॉग इन करा.
स्टेप 4: आपला निकाल स्क्रिनवर दिसून येईल.
स्टेप 5: निकाल तपासा आणि त्याची प्रिंट घ्या.

एप्रिलमध्ये होणार तिसऱ्या सत्राची परीक्षा

जेईई मेन मार्चची परीक्षा 16, 17 आणि 18 मार्च रोजी घेण्यात आली होती. ही दुसऱ्या सत्राची परीक्षा होती. यानंतर आता तिसर्‍या सत्राची परीक्षा एप्रिलमध्ये आणि चौथ्या सत्राची परीक्षा मे मध्ये होणार आहे. प्रथमच, जेईई मेन परीक्षा एका वर्षात चार वेळा घेण्यात येत आहे. ही परीक्षा प्रथमच 13 भाषांमध्ये घेण्यात आली. यात आसामी, बंगाली, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तामिळ, तेलगू, उर्दू, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती आदि भाषांचा समावेश आहे.

मातृभाषेत परीक्षा

नव्या शिक्षण धोरणानुसार जेईई मेन मार्च 2021 सत्राची परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेसह तेलुगू, तामिळ, पंजाबी, उर्दू, ओडिशा, मराठी, मल्याळम, कन्नड, बंगाली, आमामी आणि गुजराती भाषेमध्ये घेतली गेली आहे. विद्यार्थ्यांना प्रथमच त्यांच्या मातृभाषेत परीक्षा देण्याची संधी मिळाली होती. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट अशा पद्धतीनं घेतली गेली. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं मार्च 2021 सत्राची उत्तरतालिका दोन दिवसांपूर्वी (JEE Main March Session) जाहीर केली होती. विद्यार्थ्यांना आक्षेप आक्षेप नोंदवण्यास मुदत दिली होती.  (JEE Main Exam March Session Results Announced, View Results at jeemain.nta.nic.in)

इतर बातम्या

CMAT 2021 Admit Card: कॉमन मॅनेजमेंट ॲडमिशन परीक्षेचे ॲडमिट कार्ड जाहीर , cmat.nta.nic.in इथून करा डाऊनलोड

IIT Delhi Admission 2021 : आयआयटी दिल्लीमध्ये पीजी आणि पीएचडी प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू