CMAT 2021 Admit Card: कॉमन मॅनेजमेंट ॲडमिशन परीक्षेचे ॲडमिट कार्ड जाहीर , cmat.nta.nic.in इथून करा डाऊनलोड

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency)सीमॅट परीक्षेचे ॲडमिट कार्ड (CMAT Admit Card) जारी केले आहे.

CMAT 2021 Admit Card: कॉमन मॅनेजमेंट ॲडमिशन परीक्षेचे ॲडमिट कार्ड जाहीर , cmat.nta.nic.in इथून करा डाऊनलोड
सीमॅट परीक्षा

CMAT 2021 Admit Card नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (National Testing Agency)सीमॅट परीक्षेचे ॲडमिट कार्ड जारी केले आहे. कॉमन मॅनेजमेंट अ‌ॅडमिशन टेस्टचे (Common Management Admission Test) आयोजन 31 मार्चला केले जाणार आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज भरला आहे त्यांनी ऑफिशियल वेबसाईट cmat.nta.nic.in वर जाऊन अ‌ॅडमिट कार्ड डाऊनलोड करावे. विद्यार्थ्यांनी त्यांचा परीक्षा क्रमांक अ‌ॅडमिट कार्ड आणि जन्मतारीख टाकून डाऊनलोड करता येईल. (CMAT 2021 Admit Card will released download from nta on cmat nta nic in)

CMAT 2021 परीक्षा

कॉमन मॅनेजमेंट परीक्षा 2021 31 मार्चला दोन शिफ्टमध्ये आयोजित केली जाणार आहे. पहिल्या सत्रातील परीक्षा 9 ते12 आणि 12.30 तर दुसऱ्या सत्रातील परीक्षा 3 ते 6 आणि 6.30 वाजेपर्यंत होईल. ज्या उमेदवारांनी अ‌ॅडिशनल सेक्शन ”Innovation and Entrepreneurship” निवडला असेल त्यांच्यासाठी 30 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे.

CMAT Admit Card 2021 डाऊनलोड कसं करणार

स्टेप1: विद्यार्थ्यांनी अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट cmat.nta.nic.in वर भेट द्यावी.
स्टेप 2: “CMAT 2021 admit card” लिंक वर क्लिक करावे.
स्टेप 3: अ‌ॅप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख टाकून लॉगीन करावे.
स्टेप 4: लॉगीन केल्यानंतर तुमचं अ‌ॅडमिट कार्ड तुम्हाला पाहयला मिळेल.
स्टेप 5: परीक्षा केंद्रात आवश्यक असल्यानं अ‌ॅडमिट कार्डची प्रिंट काढून ठेवा.

CMAT 2021 परीक्षेचे स्वरुप

CMAT 2021 परीक्षेच्या परिपत्रकानुसार ही परीक्षा एकूण 500 गुणांसाठी होणार आहे. या परीक्षेत एकूण 125 प्रश्न विचारले जातील. 1 प्रश्नाला 4 गुण निश्चित करण्यात आले आहेत. तार्किक क्षमता आणि माहितीचे विश्लेषण यासाठी 25, लॉजिकल रिझनिंगसाठी 25, भाषा कौशल्यं 25, सामान्य ज्ञान 25, नाविन्यता आणि उद्योजकता यासाठी 25 प्रश्न विचारले जातील.


संबंधित बातम्या:

CMAT 2021 Admit Card: कॉमन मॅनेजमेंट ॲडमिशन परीक्षेचे ॲडमिट कार्ड जाहीर होणार, cmat.nta.nic.in इथून डाऊनलोड करा

CMAT 2021 Admit Card:सीमॅट परीक्षेचे ॲडमिट कार्ड लवकरच जाहीर होणार, असं करा डाऊनलोड

(CMAT 2021 Admit Card released download from nta on cmat nta nic in)