‘कोरोना विरुद्ध लढा, पंतप्रधान मोदींशी नाही’, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

ही वेळ कोरोना विरुद्ध लढण्याची आहे. पंतप्रधान मोदींशी लढण्याची नाही, अशा शब्दात डॉ. हर्षवर्धन यांनी हेमंत सोरेन यांना सुनावलं आहे.

कोरोना विरुद्ध लढा, पंतप्रधान मोदींशी नाही, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
| Updated on: May 07, 2021 | 4:35 PM

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या काळात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेनंतर आता राजकारणाला सुरुवात झालीय. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि आसामचे मंत्री हेमंत बिस्वा यांच्यानंतर आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी हेमंत सोरेन यांच्यावर निशाणा साधलाय. ही वेळ कोरोना विरुद्ध लढण्याची आहे. पंतप्रधान मोदींशी लढण्याची नाही, अशा शब्दात डॉ. हर्षवर्धन यांनी हेमंत सोरेन यांना सुनावलं आहे. त्याचबरोबर आपल्या सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी हेमंत सोरेन पंतप्रधान मोदींवर टीका करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. (Dr. Harshvardhan answered to Jharkhand CM Hemant Soren’s criticism of PM Modi)

डॉ. हर्षवर्धन यांनी ट्वीट करत हेमंत सोरेन यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मुख्यमंत्री हेमंत सोरेन कदाचित आपल्या पदाची गरिमा विसरले आहेत. कोरोना महामारीच्या सध्यस्थितीवर बोलताना आणि पंतप्रधानांवर एखादं वक्तव्य करताना त्यांनी हे विसरू नये की, या महारामारीचा अंत सामुहिक प्रयत्नांनीच शक्य आहे. आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी पंतप्रधान मोदींवर बोलणं निंदनीय आहे’.

डॉ. हर्षवर्धन यांनी अजून एक ट्वीट केलं आहे. ‘केंद्र सरकारने कोरोना संकटाच्या काळात गरीब आणि गरजू लोकांसाठी आपली तिजोरी खुली केली आहे. तिखे झारखंड सरकारने आपली तिजोरी बंद ठेवली आहे. हेमंत सोरेन यांना वाटतं की सगळी कामं केंद्र सरकारने करावी. कोरोना विरुद्ध लढा, पंतप्रधानांविरुद्ध नाही!’

मोदींनी स्वत:चीच ‘मन की बात’ची टेप लावली – सोरेन

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशीही चर्चा केली. या चर्चेवेळी मोदींनी स्वत:चीच ‘मन की बात’ची टेप लावल्याची टीका सोरेन यांनी केली आहे. त्याबाबतचं ट्विट हेमंत सोरेन यांनी केलं असून आता हे ट्विट चर्चेचा विषय बनलं आहे.

‘आज आदरणीय पंतप्रधानांनी फोन केला. यावेळी त्यांनी फक्त त्यांची मन की बात केली. त्यापेक्षा त्यांनी कामाची गोष्ट केली असती आणि कामाचं ऐकलं असतं तर फार बरं झालं असतं’, असा टोला हेमंत सोरेन यांनी ट्विटमधून लगावला आहे.

संंबंधित बातम्या : 

भारतीय क्रिकेटपटूंना केवळ ‘कोविशिल्ड’ लस घ्यायचा सल्ला, पण कारण काय?

मोदींनी मिटींगमध्येही स्वत:चीच ‘मन की बात’ची टेप लावली, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची टीका

Dr. Harshvardhan answered to Jharkhand CM Hemant Soren’s criticism of PM Modi