मोदींनी मिटींगमध्येही स्वत:चीच ‘मन की बात’ची टेप लावली, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची टीका

देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या संकटकाळात केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील वादही समोर आले आहेत. (Jharkhand CM Hemant Soren says PM Modi spoke his mann ki baat did not listen)

मोदींनी मिटींगमध्येही स्वत:चीच 'मन की बात'ची टेप लावली, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची टीका
hemant soren
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 10:21 AM

नवी दिल्ली: देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या संकटकाळात केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील वादही समोर आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशीही चर्चा केली. या चर्चेवेळी मोदींनी स्वत:चीच ‘मन की बात’ची टेप लावल्याची टीका सोरेन यांनी केली आहे. त्याबाबतचं ट्विट हेमंत सोरेन यांनी केलं असून आता हे ट्विट चर्चेचा विषय बनलं आहे. (Jharkhand CM Hemant Soren says PM Modi spoke his mann ki baat did not listen)

आज आदरणीय पंतप्रधानांनी फोन केला. यावेळी त्यांनी फक्त त्यांची मन की बात केली. त्यापेक्षा त्यांनी कामाची गोष्ट केली असती आणि कामाचं ऐकलं असतं तर फार बरं झालं असतं, असा टोला हेमंत सोरेन यांनी ट्विटमधून लगावला आहे.

ट्विटमुळे खळबळ

गुरुवारी संध्याकाळी उशिरा सोरेन यांनी हे ट्विट केलं. त्यानंतर हे ट्विट प्रचंड व्हायरल झालं असून त्याची जोरदार चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणासहित अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांच्याशी कोविड संकटावर चर्चा केली होती. गेल्या काही दिवसांमध्ये दुसऱ्यांदा मोदींनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. यापूर्वीच्या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांसोबतची बैठक लाईव्ह केली होती. त्यावर पंतप्रधानांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे केजरीवाल यांना माफी मागावी लागली होती.

केंद्राकडून मदत नाही

यावेळी झारखंडने कोरोनाचं संकट निर्माण झालेलं असतानाही केंद्र सरकारकडून काडीचीही मदत झाली नसल्याचा आरोप केला आहे. आरोग्य सचिव अरुण सिंह यांच्या मते, राज्याला केवळ 2181 रेमडेसिवीर इंजेक्शन मिळाले आहेत. राज्य सरकार आपल्या स्तरावर बांगलादेशाकडून 50 हजार इंजेक्शन्स मागवू इच्छिते. परंतु केंद्राने अद्याप मंजुरी दिली नाही. याशिवाय झारखंडमध्ये व्हॅक्सिनचं संकटही वाढलं आहे. त्यामुळेच झारखंडमध्ये अद्याप 18 वर्षांवरील युवकांचं लसीकरण सुरू करण्यात आलेलं नाही. दुसरीकडे झारखंडने अनेक राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरू केला आहे. मात्र, आता झारखंडलाच ऑक्सिजन कंटेनर्सच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. (Jharkhand CM Hemant Soren says PM Modi spoke his mann ki baat did not listen)

संबंधित बातम्या:

भारताच्या धडाकेबाज क्रिकेटपटूवर दुःखाचा डोंगर, आईपाठोपाठ बहिणीचा कोरोनाने मृत्यू

व्हेंटिलेटर आणि रुग्णवाहिका मिळाली नाही, कोरोनामुळे NSG ग्रुप कमांडरचा मृत्यू

वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू, लेकीची जळत्या चितेत उडी

(Jharkhand CM Hemant Soren says PM Modi spoke his mann ki baat did not listen)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.