भारताच्या धडाकेबाज क्रिकेटपटूवर दुःखाचा डोंगर, आईपाठोपाठ बहिणीचा कोरोनाने मृत्यू

भारताच्या धडाकेबाज क्रिकेटपटूवर दुःखाचा डोंगर, आईपाठोपाठ बहिणीचा कोरोनाने मृत्यू
भारताची धडाकेबाज क्रिकेटपटू वेदा क्रृष्णमुर्तीवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. आईपाठोपाठ तिच्या बहिणीचाही कोरोनाने मृत्यू झालाय.

भारताची धडाकेबाज क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्तीवर (Veda Krushnamurthy) दु:खाचा डोंगर कोसळलाय. 15 दिवासांपूर्वी तिच्या आईला कोरोनाने हिरावून नेलं. त्या दुखा:ची आसवं आणखी पूर्णपणे पुसलीही गेली नसताना तिच्या बहिणीचा कोरोनाने मृत्यू झालाय. (Indian Women Cricketer veda krushnamurthy lost Mother And Sister Due Covid 19)

Akshay Adhav

|

May 07, 2021 | 9:22 AM

मुंबई : भारताची धडाकेबाज क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्तीवर (Veda Krushnamurthy) दु:खाचा डोंगर कोसळलाय. 15 दिवासांपूर्वी तिच्या आईला कोरोनाने हिरावून नेलं. त्या दुखा:ची आसवं आणखी पूर्णपणे पुसलीही गेली नसताना तिच्या बहिणीचा कोरोनाने मृत्यू झालाय. आई आणि बहिणीच्या अकाली मृत्यूने वेदा कृष्णमुर्ती उन्मळून पडलीय. केवळ 15 दिवसांत घरातील दोन जीवाभावाची माणसं वेदाला सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेली आहेत. (Indian Women Cricketer Veda Krushnamurthy lost Mother And Sister Due Covid 19)

बहिणीचा कोरोनाने मृत्यू

वेदाची बहीण 45 वर्षीय वत्सला यांचं निधन चिक्कमंगलुरुच्या एका खाजगी रुग्णालयात झालं. त्यांच्यावर रुग्णालयात कोरोनावरील उपचार सुरु होते. मात्र उपचारांना त्या योग्य प्रतिसाद देत नव्हत्या. अखेर त्यांची प्राणज्योत बुधवारी रात्री मालवली.

15 दिवसांत आई आणि बहिणीचा कोरोनाने मृत्यू

वेदा कृष्णमुर्तीच्या कुटुंबावर मोठा आघात झालाय. केवळ 15 दिवसांत वेदाने तिच्या आईला आणि बहिणीला गमावलंय. 24 एप्रिल रोजी आपली आई गेल्याचं तिने ट्विट करुन सांगितलं होतं. त्याचवेळी बहीणही कोरोनाने संक्रमित असल्याने तिची तब्येत खराब असल्याचं तिने म्हटलं होतं. त्या ट्विटला 15 दिवस होत नाहीत तोपर्यंतच वेदाला आणखी एक दु:खद बातमी द्यावी लागली. 6 मे रोजी ट्विट करुन आपली बहीण आपल्याला कायमचं सोडून निघून गेल्याचं वेदाने सांगितलंय.

वेदाला क्रिकेटर बनविण्यात बहिणीचा मोठा वाटा

वेदाला क्रिकेटर बनविण्यात तिच्या बहिणीचा मोठा वाटा राहिलाय. तिच्या मुळगावी महिलांना क्रिकेटसाठी संधी नव्हत्या. अशावेळी बंगळुरुला येऊन वेदाला क्रिकेट अकादमीत टाकून तिच्यातील नेतृत्वगुणांना वत्सला यांनी हेरलं. पुढे वेदा भारतीय संघात खेळू लागली. वत्सला यांचं स्वप्न पूर्ण झालं. वेदाने आतापर्यंत 48 एकदिवसीय आणि 76 टी ट्वेन्टी सामने खेळले आहेत.

आईशिवाय कुटुंबाची कशी कल्पना करु?

“मी माझ्या आईला गमावलंय. आईच्या निधनानंतर तुम्ही सर्वांनी केलेल्या प्रार्थनांसाठी धन्यवाद. तुम्ही कल्पना करु शकता, तिच्याविना कुटुंबाची मी आता कशी काय कल्पना करु?. आता आम्ही बहिणीसाठी प्रार्थना करतोय. ती कोरोनाशी दोन हात करतीय. मी सध्या कोरोना निगेटीव्ह आली आहे. तुम्ही काळजी घ्या. माझ्या सहवेदना त्या लोकांसोबत आहेत जे अशा मुश्किल परिस्थितीतून जात आहेत”, अशा भावना तिने आई गेल्यानंतर व्यक्त केल्या होत्या.

(Indian Women Cricketer veda krushnamurthy lost Mother And Sister Due Covid 19)

हे ही वाचा :

कोरोनाकाळात घोडेसवारी, रवींद्र जाडेजा म्हणतो, ‘मी आता पूर्णपणे सुरक्षित…!’

क्रिकेट विश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला, 36 वर्षीय विवेक यादवचं कोरोनाने निधन

भारताचं प्रेम पाहून इंग्लंडचा खेळाडू हरखून गेला, म्हणतो, ‘भारत असा देश….’

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें