AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचं प्रेम पाहून इंग्लंडचा खेळाडू हरखून गेला, म्हणतो, ‘भारत असा देश….’

इंग्लंडचा धडाकेबाज खेळाडू जॉस बटलरने (Jos Buttler) भारताविषयी, इथल्या लोकांविषयी एक खास पोस्ट लिहून त्यांचे आभार मानले आहेत. तसंच सद्यस्थितीतून भारत लवकर पूर्वपदावर यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. (England Player Jos Buttler Tweet Over India After IPL 2021 Postponed)

भारताचं प्रेम पाहून इंग्लंडचा खेळाडू हरखून गेला, म्हणतो, 'भारत असा देश....'
इंग्लंडचा धडाकेबाज खेळाडू जॉस बटलरने (Jos Buttler) भारताविषयी, इथल्या लोकांविषयी एक खास पोस्ट लिहून त्यांचे आभार मानले आहेत.
| Updated on: May 07, 2021 | 7:26 AM
Share

मुंबई : भारतात कोरोना व्हायरसचा प्रकोप सुरु आहे. गेले कित्येक दिवस दरदिवशी 3 ते 4 लाख कोरोनाबाधित रुग्ण मिळत आहेत. कोरोनाने क्रिकेटच्या मैदानातही एन्ट्री घेतल्याने आयपीएलचं 14 वं पर्व (IPL 2021) स्थगित करण्यात आलं. पर्व जरी स्थगित करण्यात आलेलं असलं तरी खेळाडू प्रेक्षकांना आयपीएलची वारंवार आठवण येत आहे. इंग्लंडचा धडाकेबाज खेळाडू जॉस बटलरने (Jos Buttler) भारताविषयी, इथल्या लोकांविषयी एक खास पोस्ट लिहून त्यांचे आभार मानले आहेत. तसंच सद्यस्थितीतून भारत लवकर पूर्वपदावर यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. (England Player Jos Buttler Tweet Over India After IPL 2021 Postponed)

जॉस बटलरसाठी आयपीएलचं 14 वं पर्व खास

राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या जॉस बटलरसाठी आयपीएलचं 14 वं पर्व खूप खास राहिलं. त्याने आपल्या कुटुंबासह आयपीएलचे दिवस खूप इन्जॉय केले. जॉसच्या लेकीचा वाढदिवसही राजस्थानच्या सर्व संघ सहकाऱ्यांनी मोठ्या दिमाखात साजरा केला. या सगळ्या आठवणीने जॉस भावूक झाला. म्हणूनच लेकीच्या वाढदिवसाचे सुंदर फोटो शेअर करत भारत देश खूप खास असल्याचं जॉस म्हणाला.

जॉस बटलरने केलेल्या ट्विटमध्ये काय म्हटलंय…?

आयपीएलचं 14 वं पर्व स्थगित झाल्यानंतर जॉस बटलरने एक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये त्याने भारताविषयी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. “भारत हा खूप खास देश जो सध्या कठीण परिस्थितीतून जातोय. माझं आणि माझ्या कुटुंबाचं स्वागत करण्यासाठी मी तुमचा आभारी आहे, जसं स्वागत तुम्ही नेहमी करता. सुरक्षित रहा, आपली काळजी घ्या”, असं आपल्या ट्विटमध्ये जॉस बटलरने म्हटलंय.

हैदराबादविरुद्ध जॉस बटलरचं धडाकेबाज शतक

राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या जॉस बटलरसाठी आयपीएलचं 14 वं पर्व खूप खास राहिलं. त्याने हैदराबादविरुद्ध खेळताना धडाकेबाज शतक ठोकलं. या हंगामातील त्याचं हे पहिलंच शतक ठरलं. राजस्थासाठी या हंगामात तो ओपनिंग करत होता तसंच त्याची बॅटही चांगली बोलत होती. पण दुर्दैवाने 14 वा हंगाम स्थगित झाला.

(England Player Jos Buttler Tweet Over India After IPL 2021 Postponed)

हे ही वाचा :

‘ओ हसीना बडी सुंदर सुंदर’, बायकोच्या वाढदिवशी जसप्रीतकडून रोमँटिक फोटो शेअर करत खास मेसेज!

PHOTO | कोरोनामुळे IPL 2021 चा बाजार उठला, ‘या’ स्पर्धांवरही धोका कायम, भारताला यजमानपद गमावावं लागणार?

IPL 2021 | ‘We Are Famly’, खेळाडू घरी पोहचत नाहीत तोवर आम्ही दिल्लीतच, मुंबई इंडियन्सनचा निर्धार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.