भारतीय क्रिकेटपटूंना केवळ ‘कोविशिल्ड’ लस घ्यायचा सल्ला, पण कारण काय?

भारतीय खेळाडूंना कोविशिल्ड लस घेण्याचा सल्ला दिला गेला आहे. कारण भारतीय संघ इंग्लंडमध्ये सुमारे चार महिने असल्याने संघातील खेळाडू कोविशिल्डचा दुसरा डोस सहज घेऊ शकतात. (only Covishield Dose For indian Cricketer England Tour)

भारतीय क्रिकेटपटूंना केवळ 'कोविशिल्ड' लस घ्यायचा सल्ला, पण कारण काय?
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 3:17 PM

मुंबई : कोरोनाविरोधी लढ्यात लसीकरण ही ढाल बनलीय. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरणावर भर दिला जात आहे. भारत सरकारने तर आता 18 ते 44 वयोगटाच्या दरम्यानच्या लोकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे.  सरकारच्या या योजनेत भारतीय क्रिकेटपटूंचा देखील समावेश आहे. अशातच भारतीय क्रिकेटपटूंना केवळ ‘कोविशिल्ड’ (Covishield) लस घ्यायचा सल्ला सल्ला देण्यात आल्याची माहिती एका रिपोर्टनुसार पुढे आली आहे. (only Covishield Dose For indian Cricketer England Tour)

कोरोनामुळे आयपीएलचा 14 वा हंगाम स्थगित करण्यात आलाय. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटू आपापल्या घरी आहेत. काही दिवस ते आपल्या कुटुंबाबरोबर क्लालिटी टाईम घालवतील. नंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना आणि इंग्लंड दौऱ्यावर भारतीय टीम जाणार आहे. त्याअगोदर भारतीय संघाच्या खेळाडूंनी केवळ कोविशिल्डचा डोस घ्यावा, असा सल्ला देण्यात आल्याची माहिती, एका रिपोर्टनुसार पुढे आलीय. आता हा असा सल्ला का देण्यात आलाय, हे आपण पाहूया…

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याअगोदर भारतीय खेळाडूंच्या लसीकरणाविषयी काय प्लॅन आहे?, असा प्रश्न बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना गांगुलीने संपूर्ण प्लॅन सांगितला.

बीसीसीआयचा प्लॅन काय?

“भारतीय खेळाडूंजवळ आता वेळ आहे. व्यक्तिगत पातळीवर ते स्वत: लस घेऊ शकतात. सगळे खेळाडू आपापल्या घरी गेले आहेत. त्यामुळे लस घेणं त्यांच्यासाठी अधिक सोपं झालंय”, असं सौरव गांगुली म्हणाला.

खेळाडूंना फक्त कोविशिल्ड लसच घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोविशिल्ड लस घेणं केवळ त्याच क्रिकेटपटूंसाठी आवश्यक आहे जे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंड मालिकेत भाग घेऊ शकतात.

भारतीय खेळाडूंनी कोविशिल्डचा पहिला डोस भारतात घेतल्यास त्यांना दुसरा डोस इंग्लंडमध्ये घेता येईल. ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राजेनेकाचं कोविशिल्ड हे प्रोडक्ट असल्याने इंग्लंडमध्ये असताना भारतीय खेळाडू कोविशिल्डचा दुसरा डोस घेऊ शकतात.

ज्या लसीचा पहिला डोस, त्याच लसीचा दुसरा डोस घ्यावा लागणार

कोविड 19 च्या लसीकरण मार्गदर्शक तत्वानुसार कोरोना विषाणूच्या कोणत्याही लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक आहे. जर एखाद्याने कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतला असेल तर त्यांना कोवॅक्सिनचाच दुसरा डोस घ्यावा लागेल. म्हणूनच भारतीय खेळाडूंना कोविशिल्ड लस घेण्याचा सल्ला दिला गेला आहे. कारण भारतीय संघ इंग्लंडमध्ये सुमारे चार महिने असल्याने संघातील खेळाडू कोविशिल्डचा दुसरा डोस सहज घेऊ शकतात.

(only Covishield Dose For indian Cricketer England Tour)

हे ही वाचा :

‘देशातील कोरोनाची स्थिती पाहून हृदय तुटतंय’, विराट-अनुष्काने उचललं मोठं पाऊल!

रिषभ पंतची गर्लफ्रेंड इशाचा रोमँटिक व्हिडीओ व्हायरल, 5 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये ‘प्रेमाचा इजहार’

भारताचं प्रेम पाहून इंग्लंडचा खेळाडू हरखून गेला, म्हणतो, ‘भारत असा देश….’

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.