AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्यार्थी आंदोलनाबाबत सर्वात मोठी बातमी, भाजपकडून उद्या झारखंड बंदची घोषणा

BJP Jharkhand Bandh : विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ भाजपने उद्या झारखंड बंदची घोषणा केली आहे. आरोग्य सेवा आणि इतर महत्त्वाच्या सेवा वगळता इतर सर्व आस्थापने बंद राहणार आहेत.

विद्यार्थी आंदोलनाबाबत सर्वात मोठी बातमी, भाजपकडून उद्या झारखंड बंदची घोषणा
BJP Jharkhand BandImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 10, 2026 | 10:16 PM
Share

झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ भाजपने उद्या (11 ऑगस्ट) संपूर्ण राज्यात बंदची घोषणा केली आहे. भाजपने हेमंत सोरेन सरकारवर विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आणि आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून कारवाई केल्याचा आरोप केला आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांच्यासह भाजप नेत्यांनी सरकारवर आरोप करताना म्हटले की, ‘राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षांबाबत सातत्याने वाद निर्माण होत आहेत. JPSC आणि JSSCच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार होत आहे, त्यामुळे या प्रकरणाची CBI चौकशी करण्यात यावी.

विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

आजच्या पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांनी सांगितले की, विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून जयपाल सिंह मुंडा स्टेडियम परिसरात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. वादग्रस्त परीक्षा रद्द करणे आणि संपूर्ण प्रकरणाची CBI चौकशी करणे या विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. आंदोलनादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, वॉटर कॅननचा वापर केला आणि लाठीचार्ज केला. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. आंदोलनासाठी उभारण्यात आलेला विद्यार्थ्यांचा मंडप हटवण्याचा प्रयत्नही पोलिसांनी केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.

11 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून बंद

उद्या सकाळी 8 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत झारखंड बंद राहणार आहे. मात्र आरोग्य सेवा तसेच देवघरासह इतर धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या कावडधारी भाविकांना या बंदमधून वगळण्यात आले आहे. भाजप नेत्यांनी सांगितले की, पक्ष विद्यार्थी आंदोलनाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर त्यांच्याशी चर्चा करून तोडगा काढावा. तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी पुन्हा गैरवर्तन झाल्यास भाजप त्याचा विरोध सुरूच ठेवेल, असा इशाराही पक्षाने दिला आहे.

दरम्यान, JPSC-JSSC परीक्षांवरून भाजपने सरकारला घेरले आहे. पक्षाच्या नेत्यांनी CGL, सहाय्यक आचार्य, PGT आणि उत्पादन सिपाही भरतीसह अनेक नियुक्ती प्रक्रियांमध्ये गैरप्रकार झाल्याचे आरोप केले. भाजपने म्हटले की, विद्यार्थ्यांचा राज्याच्या तपास यंत्रणांवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे या प्रकरणांची CBI चौकशी करण्यात यावी.

Follow Us
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना