विद्यार्थी आंदोलन पेटलं! दिल्लीची झारखंडमध्ये पुनरावृत्ती; पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

दिल्लीची झारखंडच्या रांचीमध्ये पुनरावृत्ती झाली आहे. पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे.

विद्यार्थी आंदोलन पेटलं! दिल्लीची झारखंडमध्ये पुनरावृत्ती; पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज
| Updated on: Aug 10, 2026 | 2:34 PM

दिल्लीच्या जंतरमंतरनंतर आता झारखंडच्या रांचीमध्ये परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात आंदोलन पेटलं आहे. गेल्या 17 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या विद्यार्थ्यांनी आज सोमवारी झारखंडच्या विधानभवनावर मोर्चा काढला. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांचा मोठा फौजफाटा असतानाही विद्यार्थी आंदोलकांनी बॅरिकेट्स हटवून विधानभवनाच्या दिशेकडे कूच केली. परंतु विद्यार्थी आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दिल्लीच्या जंतर-मंतरची पुनरावृत्ती रांचीमध्ये पाहायला मिळाली.

झारखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी आंदोलन सुरू आहे. विद्यार्थी आंदोलकांनी आज विधानभवन मार्चचा नारा दिला होता. विद्यार्थ्यांच्या विधानभवन मार्चच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. विधानभवनाच्या परिसरात सैन्य दलातील 1500 तैनात करण्यात आले होते. आंदोलनावर देखरेख ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचाही वापर केला जात आहे. एकीकडे सरकारने विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचा दावा केला आहे. त्यानंतरही विद्यार्थी माघार घ्यायला तयार नसल्याची माहिती मिळत आहे. खरंतर विद्यार्थ्यांनी मागण्या मान्य केल्याचा सरकारचा दावा फेटाळून लावला आहे. त्यामुळे रांचीमध्ये सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष पेटल्याचे समोर येत आहे.

रांचीमध्ये विद्यार्थी आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले आहेत. झारखंडमध्ये देवेंद्र नाथ महतो यांच्या नेतृत्वात मोर्चा सुरू आहे. आंदोलन पेटल्याने रांचीमध्ये पोलिसांनी आंदोलकांवर पाण्याचा मारा केला. त्यानंतरही आंदोलकांनी माघार घेतलेली नाही. बॅरिकेट्स आणि पाण्याचा फवारा मारल्यानंतरही आंदोलक दुसऱ्या मार्गाने विधानभवनाच्या दिशेने जात आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विधानभवनाच्या 750 मीटर परिसरात कलम 163 लागू करण्यात आला आहे. विद्यार्थी आंदोलनामुळे झारखंडमधील राजकीय वातावरण तापलं आहे.

विद्यार्थ्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. रांचीमध्ये ‘विधानभवन घेराव’ मार्च काढल्यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अमानुषपणे मारहाण केली आहे. यावर एका विद्यार्थी आंदोलकाने पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. त्याने म्हटलं की, विद्यार्थी आंदोलकांवर अतिशय अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला आहे. लाठीचार्ज हा कमरेच्या खाली केला पाहिजे. आमच्या डोके, हात, चेहरा, शरीराच्या इतर भागांवर मारहाण केली आहे. हा सरकारचा दुपट्टीपणा आहे’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us