त्रेतायुगात चष्मा कुठून आला? ‘श्री रामायण कथा’च्या पोस्टरवरील ‘चुकी’ ची यूजर्सनी उडवली खिल्ली
Mahakavya Shri Ramayan Katha Review In Hindi : 'श्री रामायण कथा' हा चित्रपट आज (25 सप्टेंबर) थिएटरमध्ये रिलीज झाला. या चित्रपटात अंजली अरोरा सीतामाईच्या तर देव शर्मा श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे.

नमित मल्होत्राच्या 4000 कोटी रुपयांच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यात रणबीर कपूर, साई पल्लवी, यश, रवी दुबे आणि सनी देओलची प्रमुख भूमिका आहे. दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र त्यापूर्वीच कमी बजेटचा पौराणिक चित्रपट ‘श्री रामायण कथा’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आज, म्हणजेच शुक्रवार 25 सप्टेंबर रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात अंजली अरोरा ही सीतामाईच्या भूमिकेत दिसत आहे, तर देव शर्मा यांनी भगवान रामाची भूमिका साकारली आहे. रिलीजपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत आला होता. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिल्यानंतर काही यूजर्सनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) चित्रपटाबद्दल मजेशीर प्रतिक्रिया शेअर केल्या. मात्र, चित्रपटापेक्षा सध्या त्यातील एक पोस्टर सोशल मीडियावर अधिक चर्चेत आले आहे. या पोस्टरमधील एका छोट्याशा गोष्टीने इंटरनेट यूजर्सचे लक्ष वेधून घेतलं असून, त्यावरून सोशल मीडियावर भन्नाट कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
चष्म्याने वेधलं लक्ष
चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी निर्मात्यांनी चित्रपटातील इतर पात्रांची ओळख करून देणारं एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं होतं. या पोस्टरमध्ये सुग्रीवच्या व्यक्तिरेखेची झलक दाखवण्यात आली. मात्र, त्याच्या मागे दिसणाऱ्या वानर सेनेतील एका व्यक्तीच्या चेहऱ्यावरील चष्म्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यानंतर नेटकऱ्यांनी या चष्म्याचा मुद्दा पकडला आणि चित्रपटाची मजेशीर पद्धतीने खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. त्रेतायुगात चष्मा आला तरी कुठून? असा प्रश्न अनेक नेटकऱ्यांनी विचारला.

एका यूजरने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले. या पोस्टरमध्ये सुग्रीवच्या भूमिकेच्या मागे वानर सेना दिसत असून, त्यातील एका व्यक्तीने चष्मा घातल्याचे स्पष्टपणे दिसलं. “ मला नुकताच एक्सवर हा फोटो मिळाला. अंजली अरोराच्या रामायणातील ‘वानर सेने’चा भाग असलेल्या या व्यक्तीने चष्मा घातला आहे का?” असा सवाल एकाने विचारला. या पोस्टवर इतर यूजर्सनीही मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. “त्रेतायुगात चष्मा कोण घालतं?” असं एकाने विचारलं. तर दुसऱ्याने लिहिलं की, “हनुमानजी हनुमानजींसारखे दिसत नाहीत.” “वानर सेनेबद्दल तर विचारूच नका” असं म्हणत आणखी एका यूजरने वानर सेनेवर टिप्पणी केली.
I just got this pic from x and Is that person wearing a spec which is so call Vanar Sena in Anjali Arora’s Ramayana ???😭😭😭😭 #ramayana #anjaliarora pic.twitter.com/S0BAoG46Ez
— Dibyansh (@DEEEP26138305) September 24, 2026
चष्मा एडिट करायचा ना
एका यूजरने तर थेट लिहिलं, “ अरे चष्मा तरी एडिट करायचा होता ना, थोडी तरी लाज बाळगा भाऊ”. एवढंच नव्हे तर तर आणखी एखाने मजेशीर कमेंट केली की “पहिल्यांदाच त्रेतायुगात चष्मा पाहिला.”
View this post on Instagram
अंजली अरोराबद्दलही चर्चा
‘महाकाव्य श्री रामायण कथा’ हा चित्रपट केवळ पोस्टरमधील चष्म्यामुळे चर्चेत आलेला नाही. चित्रपटाचा टीझर समोर आल्यापासूनच त्याच्या कास्टिंगबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. विशेषतः माता सीतेच्या भूमिकेसाठी अंजली अरोराची निवड करण्यात आल्याने सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. अंजली अरोराला सोशल मीडिया यूजर्स तिच्या व्हायरल व्हिडिओंमुळे ओळखतात. विशेषतः ‘कच्चा बदाम’ या गाण्यावर केलेल्या तिच्या डान्समुळे ती चर्चेत आली होती. आणि तिनेच सीतामाईची भूमिका करणं अनेकांना रुचलं नव्हतं.
