Kaleshwaram Project | जगाच्या इतिहासात अद्भुत अभियांत्रिकी चमत्कार, कलेश्वरम प्रकल्पाविषयी ‘डिस्कव्हरी’वर लघुपट

| Updated on: Jun 20, 2021 | 10:45 AM

इंग्रजीसह सहा भारतीय भाषांमध्ये येत्या शुक्रवारी म्हणजे 25 जून रोजी रात्री 8 वाजता 'लिफ्टिंग अ रिव्हर' हा लघुपट डिस्कव्हरी वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले दिग्दर्शक राजेंद्र कोंडापल्ली (Rajendra Kondapalli) यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले

Kaleshwaram Project | जगाच्या इतिहासात अद्भुत अभियांत्रिकी चमत्कार, कलेश्वरम प्रकल्पाविषयी डिस्कव्हरीवर लघुपट
Kaleshwaram Project
Follow us on

मुंबई : तेलंगणातील कलेश्वरममध्ये (Kaleshwaram) गोदावरी नदीवर असलेल्या कलेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पावर ( Kaleshwaram Lift Irrigation Project (KLIP) डिस्कव्हरी वाहिनी विशेष डॉक्युमेंट्री दाखवणार आहे. ‘लिफ्टिंग अ रिव्हर’ (LIFTING A RIVER) हा भव्य कलेश्वरम प्रकल्पाची महती सांगणारा आंतरराष्ट्रीय लघुपट डिस्कव्हरी वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे. तेलुगू भूमीसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब मानली जाते. (Kaleshwaram Lift Irrigation Project KLIP LIFTING A RIVER Documentary on Discovery Channel by Rajendra Kondapalli)

डिस्कव्हरी वाहिनीवर ‘लिफ्टिंग अ रिव्हर’

आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले दिग्दर्शक राजेंद्र कोंडापल्ली (Rajendra Kondapalli) यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. या प्रकल्पाने आश्चर्यकारक मार्गांनी अनेकांच्या आयुष्याला कसा स्पर्श केला आहे, यावर या डॉक्युमेंट्रीतून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. इंग्रजीसह सहा भारतीय भाषांमध्ये येत्या शुक्रवारी म्हणजे 25 जून रोजी रात्री 8 वाजता ‘लिफ्टिंग अ रिव्हर’ हा लघुपट डिस्कव्हरी वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे.

अभियांत्रिकी विश्वातील चमत्कार

एमईआयएल (MEIL- Megha Engineering & Infrastructures Limited) ने बांधलेला हा जगातील सध्याच्या घडीचा सर्वात मोठा मल्टी-स्टेज उपसा सिंचन प्रकल्प मानला जातो. हा अभियांत्रिकी विश्वातील चमत्कारच म्हटला जातो. भव्य कलेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प हा तेलंगणाचा अभिमान आहे. ‘लिफ्टिंग अ रिव्हर’ या डॉक्युमेंट्रीतून आंतरराष्ट्रीय स्तरावर हा विषय मांडला जाणार आहे.

प्रख्यात दिग्दर्शक राजेंद्र कोंडापल्ली यांच्या नजरेतून ही दृकश्राव्य मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. इंग्रजीसह सहा भारतीय भाषांमध्ये येत्या शुक्रवारी म्हणजे 25 जून रोजी रात्री 8 वाजता ‘लिफ्टिंग अ रिव्हर’ हा लघुपट डिस्कव्हरी वाहिनीवर न चुकता पाहा

तेलंगणा मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्वीट :

संबंधित बातम्या :

ऑक्सिजन पुरवठ्यासाठी MEIL मैदानात, ‘या’ राज्यांना मोफत ऑक्सिजन पुरवणार

कोरोना लढाईत MEIL चं मोठं योगदान, आधी ऑक्सिजन, आता तब्बल 3000 बेडचं कोव्हिड रुग्णालय

(Kaleshwaram Lift Irrigation Project KLIP LIFTING A RIVER Documentary on Discovery Channel by Rajendra Kondapalli)