RSS 100 Years : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण; अखंड भारताचा संकल्प, कांचीपीठाच्या शंकराचार्यांनी काय करुन दिली आठवण?

Kanchi Peeth Shankaracharya on RSS centenary : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला या विजयादशमीला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. कांची पीठाचे शंकराचार्य आणि ज्येष्ठ नेते करण सिंग यांनी संघाला शुभेच्छा देताना राष्ट्राच्या जडणघडणीत या संघटनेची भूमिका विषद केली आहे.

RSS 100 Years : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण; अखंड भारताचा संकल्प, कांचीपीठाच्या शंकराचार्यांनी काय करुन दिली आठवण?
अखंड भारताची आठवण
| Updated on: Oct 01, 2025 | 8:58 AM

Kanchi Peeth Shankaracharya on RSS centenary : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला या विजयादशमीच्या पावन पर्वावर 100 वर्षे पूर्ण होतील. कॅडर बेस असलेल्या अशा अनेक संघटना तयार झाल्या. कसोटीवर चालल्या. पण त्यांना संघासारखं सातत्य टिकवात आले नाही. संघ ध्वज हा गुरूस्थानी आहे. तर व्यक्ती या सेवक आहेत. “सेवा है यज्ञकुंड समिधा सम हम जले” ही संघाची शिकवण आहे. गाजावाजा नाही, प्रसिद्धी नाही. तरीही अखंड कार्यरत राहणाऱ्या या संघटनेविषयी जगात कुतुहल आहे. संघाला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. कांची पीठाचे शंकराचार्य आणि ज्येष्ठ नेते करण सिंग यांनी संघाला शुभेच्छा देताना राष्ट्राच्या जडणघडणीत या संघटनेची भूमिका विषद केली आहे.

अखंड भारताची आठवण

कांची पीठाचे शंकराचार्यांनी यावेळी अखंड भारताची आठवण जागवली. अनेकांनी अखंड भारताची ज्योत मनात तेवत ठेवली आहे. 1925 मध्ये त्याआधारेच डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूरमध्ये संघाचा पाया रचला. देशाच्या मध्यवर्ती भागात विदर्भात या राष्ट्रीय ध्येयवादी संघटनेची सुरुवात झाली. “भारताची संस्कृती, सभ्यता, शांती, विकास हे निःस्वार्थ सेवेत रूजलेले आहे. नागपूरमध्ये हा यज्ञकुंड सुरू झाला. त्याला आता 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. 2025 मध्ये संघ शताब्दी वर्ष साजरे करत आहे.,” असे ते म्हणाले.

संघाचे सेवा प्रकल्प आणि चारित्र्य निर्मितीचे कार्य भारतीय न्यायशास्त्र आणि धर्माशी सुसंगत आहे. कांची पीठाशी संघाच्या ऐतिहासिक संबंधांना उजाळा देताना, त्यांनी आदरणीय शंकराचार्य चंद्रशेखर सरस्वती महाराज यांनी संघाला आशीर्वाद दिल्याची आठवण करुन दिली. चेन्नईमध्ये झालेल्या मेळाव्याचा उल्लेख करत, त्यावेळी गोळवलवकर गुरूजी यांनी त्यांच्या गुरुबद्दल आदरभाव बाळगून कांचीपूरमला खास भेट दिली. त्यावेळी त्यांच्या मागे अखंड भारताचा नकाशा होता याची आठवण पुन्हा एकदा शंकराचार्यांनी यावेळी संघाला करून दिली. गोळवलकर गुरुजींना देव आणि राष्ट्राची भक्ती करण्याचा आशीर्वाद कांचीपूरम येथून मिळाला होता असे आताच्या शंकराचार्यांनी स्मरण केले.


विराट हिंदू समाज स्थापनेच्या आठवणीला उजाळा

तर ज्येष्ठ नेते करण सिंग यांनी विराट हिंदू समाज संघटना स्थापनेवेळी संघाने केलेल्या मदतीचा आवर्जून उल्लेख केला. विराट हिंदू समाज 1982 मध्ये स्थापन झाला होता. त्यावळी संघाने भरभरून मदत केल्याचे ते म्हणाले. आता संघ शताब्दी वर्षात आला आहे. संघाच्या लाखो स्वयंसेवकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. भारत हा विकसीत आणि शक्तीशाली व्हावा. जगाचे नेतृत्व भारताने करावे अशा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. उज्ज्वल भारतासाठी संघाची भूमिका त्यांनी विषद केली.