त्यांची इटलीची आई…कंगना राणौत यांची राहुल गांधींवर टीका; म्हणाल्या देशातील जनता…

एका बाजूला राहुल गांधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून काही मुद्द्यांवर उत्तर मागतात आणि दुसऱ्या बाजूला त्याचवेळी संबंधितांचे म्हणणे ऐकून घेण्याची त्यांची तयार नसते, असा टोला कंगना राणौत यांनी लगावला.

त्यांची इटलीची आई...कंगना राणौत यांची राहुल गांधींवर टीका; म्हणाल्या देशातील जनता...
kangana ranaut and rahul gandhi and sonia gandhi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 12, 2026 | 9:18 PM

Kangana Ranaut Vs Rahul Gandhi : भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत या नेहमीच चर्चेत असतात. दिल्लीतील जेन झी तरुणांच्या आंदोलनावर त्यांनी सडून टीका केली होती. या टीकेनंतर वाद झाल्यामुळे नंतर त्यांनी नरमाईची भूमिका घेतली. त्या सातत्याने काँग्रेस, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत असतात. दरम्यान, आता त्यांनी राहुल गांधी यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केल आहे. इटली देशाचे नाव घेत त्यांनी ही टीका केली आहे. राहुल गांधी संसद आणि देशाची प्रतिमा खराब करत आहेत, त्यांच्या वक्तव्यांमुळे संसदेत गांभीर्य राहिले नाही, असे कंगना राणौत म्हणाल्या.

राहुल गांधी यांच्यावर राणौत यांचा हल्लाबोल

राहुल गांधी प्रत्येक गोष्टीची खिल्ली उडवत आहेत. संसदेत अशा प्रकारचे वर्तन आपण पहिल्यांदाच पाहत आहोत. एका बाजूला ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून काही मुद्द्यांवर उत्तर मागतात आणि दुसऱ्या बाजूला त्याचवेळी संबंधितांचे म्हणणे ऐकून घेण्याची त्यांची तयार नसते, असा टोला त्यांनी लगावला.

विरोधी पक्षनेते म्हणून ते ज्या पद्धतीने…

राहुल गांधी यांनी संसदेच्या प्रतिष्ठेचा आणि मर्यादेचा विचार करायला हवा, असेही कंगना म्हणाल्या. त्यांच्या वर्तनाकडे केवळ भारतातील नागरिकच नव्हे, तर संपूर्ण जगाचे लक्ष असे म्हणत त्यांनी राहुल गांधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विरोधी पक्षनेते म्हणून ते ज्या पद्धतीने काम करत आहेत, ते पाहता हा त्यांचा शेवटचा कार्यकाळ ठरू शकतो, असा टोलाही कंगना राणौत यांनी लगावला.

स्वत:शिवाय दुसऱ्या कोणाचेही अस्तित्व…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याबद्दलही कंगना यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले. मोदी हे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले पंतप्रधान असून, सलग तिसऱ्यांदा जनतेने त्यांना संधी दिली आहे, असे त्या म्हणाल्या. राहुल गांधी यांना देशात स्वत:शिवाय दुसऱ्या कोणाचेही अस्तित्व मान्य नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

त्यांची इटलीची आई…

याशिवाय कंगना यांनी राहुल गांधींवर जॉर्ज सोरोस आणि काही आंतरराष्ट्रीय शक्तींशी संबंधित असल्याचा आरोप केला. देश अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्या म्हणाल्या. राहुल गांधी यांच्या मागण्यांकडे जनता फारसे गांभीर्याने पाहत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. शेवटी कंगना यांनी राहुल गांधींच्या राजकीय नेतृत्वावर टीका केली. त्यांच्या इटलची आई विरोधकांवर राहुल यांना नेता म्हणून स्वीकारण्यासाठी दबाव टाकत आहेत, असा दावा त्यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us