kangana ranaut : नुपूर शर्माला आता कंगनाचा पाठिंबा; म्हणाली- हिंदू देव-देवतांचा दररोज होतो अपमान

| Updated on: Jun 08, 2022 | 7:51 PM

नुपूर शर्माने एका टीव्ही चर्चेदरम्यान मुस्लिम धर्मगुरू पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केली होती. या वक्तव्यानंतर देशभरातील मुस्लिम लोकांनी नुपूरविरोधात संताप व्यक्त केला. त्यामुळे त्याचवेळी भाजपने नुपूर यांचीही सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली.

kangana ranaut : नुपूर शर्माला आता कंगनाचा पाठिंबा; म्हणाली- हिंदू देव-देवतांचा दररोज होतो अपमान
नुपूर शर्मा
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : देशात मुस्लिम विरोधी वातावरण तयार झाले असताना भाजपच्या दोन प्रवक्त्यांनी मुस्लिमांविरोधात गरळ ओकली. इतकेच काय त्यानंतर भाजप प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद (Prophet Mohammad) यांच्याविरोधात वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर देशात टीकेची झोड उठली. तर मुस्लिम देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिमांची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर दबाव वाढत असल्याचे पाहच भारतीय जनता पक्षाने पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा (BJP spokesperson Nupur Sharma) यांना निलंबित केलं. तर महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत त्याच्यावर एफआयआरही नोंदवण्यात आल्या आहेत. दरम्यान आता नुपूर शर्मा या वादात बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना राणौत (Bollywood actress Kangana Ranaut) हिने उडी घेतली आहे. कंगनाने एक स्टेटमेंट जारी केले आहे, ज्यामध्ये तिने नुपूरला टार्गेट केले जात असल्याचे म्हटले आहे. तसेच तिने म्हटलं आहे की, हिंदू देव-देवतांचा दररोज अपमान होतो. यानंतर आता या वादाला वेगळेच वळन लागत असल्याचे समोर आले आहे.

कंगना रणौतने इंस्टाग्राम स्टोरीवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने लिहिले आहे की, ‘नूपूरला आपली बाजू सर्वांसमोर मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र यासाठी त्यांना धमक्या येत आहेत. सर्वांनी त्याला आपले लक्ष्य बनवले आहे. जेव्हा हिंदू देवांचा अपमान होतो तेव्हा आपण न्यायासाठी कोर्टात जातो आणि तो सर्वांसाठी असायला हवा. स्वतःला डॉन समजण्याचा प्रयत्न करू नका.

याच्या पुढे कंगनाने लिहिले की, ‘हा भारत आहे, अफगाणिस्तान नाही. इथे सर्व काही एकाच यंत्रणेने घडते. येथे चांगले सरकार आहे. जी लोकशाही प्रक्रियेअंतर्गत तयार करण्यात आली आहे. या गोष्टी त्यांच्यासाठी आहेत जे ही गोष्ट विसरले आहेत.’ कंगनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

नुपूरविरुद्ध ठाण्यात खटला

नुपूर शर्मा आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. शर्मा यांनी 28 मे रोजी सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली होती. नुपूरला महाराष्ट्र पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे. त्याच्यांविरुद्ध ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधित वाहिनीकडून वादग्रस्त विधानाचे व्हिडिओ फुटेजही मागवले आहे. नुपूरच्या या वक्तव्यानंतर देशासह विदेशातही खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण

नुपूर शर्माने एका टीव्ही चर्चेदरम्यान मुस्लिम धर्मगुरू पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केली होती. या वक्तव्यानंतर देशभरातील मुस्लिम लोकांनी नुपूरविरोधात संताप व्यक्त केला. त्यामुळे त्याचवेळी भाजपने नुपूर यांचीही सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली. इतकंच नाही तर मुस्लिम देशांनीही नुपूरच्या अपमानास्पद वक्तव्याला विरोध केला होता. नुपूर शर्माच्या वक्तव्यावर कुवेत, कतार आणि इराणसारख्या अनेक देशांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यानंतर भाजपकडून एक निवेदन जारी करण्यात आले, ज्यामध्ये त्यांनी सर्व धर्मांचा आदर करण्याबाबत सांगितले आहे.