झोळी घेऊन यायचा आणि श्रीमंत होऊन जायचा… एक दिवस RPF-GRP ची नजर पडली, विचारणा करताच तंतरली
बिहारमध्ये दारूबंदी असतानाही तस्करी सुरूच आहे. कानपूर सेंट्रल हे बिहारमध्ये दारू पाठवण्याचे एक प्रमुख केंद्र बनले आहे. अलिकडेच, आरपीएफने 21 वर्षीय अमित कुमारला 200 पेक्षा जास्त दारूच्या बाटल्यांसह अटक केली. तो हरियाणा मार्गे बिहारला दारू नेत होता. ही कारवाई बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची आहे, कारण या काळात तस्करी वाढल्याचे दिसून येत आहे.

बिहारमध्ये दारूवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यात दारू विकली जात नाही आणि खरेदीही केली जात नाही. पण तरीही काही अट्टल दारूडे लोक काही ना काही जुगाड करतातच. तर काही लोक बिहारमध्ये लपूनछपून दारू पाठवताना दिसत आहे. सध्या कानपूर सेंट्रल बिहारमधील दारू तस्करीचा सोपा मार्ग बनलं आहे. कानपूर सेंट्रलवरून बिहारला जाणाऱ्या ट्रेनमधून दारू नेली जात आहे. याचा खुलासा खुद्द कानपूरच्या जीआरपी आणि आरपीएफ टीम नेहमीच करत असते. नुकतेच कानपूरच्या सेंट्रल रेल्वे स्थानकात आरपीएफची टीम तपास करत होती, त्यावेळी रात्री अंधारात एक तरुण गाडीची वाट पाहत होता. त्याच्याजवळ बॅग आणि काही पोतं (झोळ्या) होते. पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि…
जीआरपी आणि आरपीएफच्या पथकाने या तरुणाला हटकले. कुठे चालला आहेस? असं विचारलं. त्यावर मी हरियाणाचा आहे. आणि बिहारला जात आहे, असं तो म्हणाला. आरपीएफच्या टीमने त्याच्या बॅगा उघडून पाहिल्या तर त्यांना धक्काच बसला. या बॅगेत आणि पोत्यांमध्ये असं काही असेल असं पोलिसांना वाटलंच नाही. त्यांनी तात्काळ या तरुणाला ताब्यात घेतलं. पोलीस चौकीत नेलं आणि त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांना धक्कादायक माहिती समजली.
फक्त 21 वर्षाचा…
सध्या बिहार विधानसभा निवडणुकीचं रण पेटलं आहे. त्यामुळे राज्यात दारू तस्करीही वेगाने वाढली आहे. हरियाणाच्या मार्गे बिहारला दारू पोहोचवली जात आहे. तर दुसरीकडे दारू तस्करांवर कारवाई करण्यासाठी जीआरपी आणि आरपीएफची टीम कसून प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कानपूर रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी एका दारू तस्कराला पोलिसांनी अटक केली आहे. अमित कुमार असं त्याचं नाव आहे. तो 21 वर्षाचा आहे आणि बिहारच्या खगडिया जिल्ह्यातील राहणारा आहे.
दारू आणि बियर
पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 200 हून अधिक दारूच्या बाटल्या सापडल्या. दोन डझन नुसत्या बियरच्या बॉटल होत्या. या पकडण्यात आलेल्या दारूची किंमत एक लाख 10 हजार रुपये आहे. एडीजी रेल्वे प्रकाश डी के आणि एसपी रेल्वे प्रयागराज प्रशांत वर्मा यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या सांगण्यावरून तो झोळी (पोतं) दारूच्या बाटल्या घेऊन बिहारला यायचा. छुप्या पद्धतीने दारू विकायचा आणि भरपूर माल घेऊन परत जायचा. हा त्याचा धंदाच होता, असंही सूत्रांनी सांगितलं.
कानपूरचे डीएसपी दुष्यंत कुमार सिंह यांच्या नेतृत्वात जीआरपी आणि आरपीएफच्या टीमने 16 जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता हैरिसगंज पूलावर आरोपीला पकडलं. आरोपी टामटीमलच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याकडे पिंपळाच्या झाडाखाली दारूच्या बाटल्या घेऊन ट्रेनची वाट पाहत होता. बिहारला दारू घेऊन जाण्याच्या तो तयारीत होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
