सीजेपीसाठी आता कबिल सिब्बल मैदानात, केली सर्वात मोठी घोषणा; देशभरात…

सीजेपीचे आंदोलन आता संपलेले आहे. सीजेपीने आंदोलन संपवले तर आम्ही कोणत्याही आंदोलकावर कारवाई करणार नाही, असे आश्वासन केंद्र सरकारने सीजेपीला दिले आहे. परंतु वेगवेगळ्या राज्यांत आंदोलकांवर कारवाई केली जात आहे, असा आरोप सीजेपीने केलाय.

सीजेपीसाठी आता कबिल सिब्बल मैदानात, केली सर्वात मोठी घोषणा; देशभरात...
kapil sibal
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 27, 2026 | 6:44 PM

Kapil Sibal CJP Protest : कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीचे आंदोलन संपलेले आहे.आंदोलन संपल्यानंतर आमच्या कोणत्याही आंदोलकावर गुन्हा दाखल होणार नाही, अशी मागणी सीजेपीने सरकारकडे केली होती. विशेष म्हणजे ही मागणी सरकारने मान्य केली होती. परंतु आता देशातील वेगवेगळ्या राज्यात सीजेपीच्या समर्थनार्थ उतरलेल्या आंदोकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. तसा दावा सीजेपीने केला आहे. असे असतानाचा आता ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे सीजेपीच्या मदतीसाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी सीजेपीच्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहून मोठी घोषणा केली आहे.

राज्यभरात सीजेपीच्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्याविषयी भूमिका स्पष्ट करण्यासाठी सीजेपीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी कपिल सिब्बल हेदेखील उपस्थित होते. त्यांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल करणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले. तसेच आंदलोकांवर जर गुन्हे दाखल केले जात असतील तर देशभरातील वकिलांनी त्यांच्यासाठी कायदेशीर लढाई लढावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आंदोलकांसाठी कायदेशीर लढा लढण्यासाठी मी एक कोटी रुपयांची देणगी देत आहे, अशी घोषणाही त्यांनी केली.

विशेष म्हणजे जे कोणी सीजेपीला देणगी देत असतील तर या देणगीचा वापर फक्त कायदेशीर लढा लढवण्यासाठी केला जाईल. यातला एकही रुपया कुठेही दुसरीकडे खर्च केला जाणार नाही, अशी माहितीही यावेळी सिब्बल यांनी दिली. सोबतच मी सीजेपीच्या आंदोलनात सहभागी नाही. माझी भूमिका ही फक्त सीजेपीला कायदेशीर मदतीपुरतीच आहे, असेही सिब्बल यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आता कपिल सिब्बल यांनी देशभरातील वकिलांनी पुढे येऊन सीजेपीची मदत करावी, असे आवाहन केल्याने सीजेपीला एका प्रकारे नवे बळ मिळाले आहे. दुसरीकडे वेगवेगळ्या राज्यात आंदोलकांवर गुन्हा दाखल केला जात असेल तर आम्ही त्यांच्यासाठी उभे आहोत, असे सीजेपीने म्हटले आहे. तसेच हे गुन्हे मागे न घेतल्यास आम्ही पुन्हा एकदा जंतर मंतरवर पुन्हा आंदोलनाला बसू, असा इशाराही सीजेपीने दिलाय. त्यामुळे आता नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us