BS Yediyurappa | कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत

कोणत्याही क्षणी येडियुरप्पा यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागितला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर बंगळुरुत झालेल्या धन्वंतरी होमहवनाला हजेरी लावल्यानंतर गुरुवारी सकाळी येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याबाबत भाष्य केलं.

BS Yediyurappa | कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत
बीएस येडियुरप्पा
Follow us
| Updated on: Jul 22, 2021 | 12:40 PM

बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी पदावरुन पायउतार होण्याचे संकेत दिले आहेत. कर्नाटकात नेतृत्वबदल होण्याच्या चर्चा सुरु असतानाच गेल्या आठवड्यात येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर कोणत्याही क्षणी येडियुरप्पा यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागितला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय म्हणाले बीएस येडियुरप्पा 

बंगळुरुत झालेल्या धन्वंतरी होमहवनाला हजेरी लावल्यानंतर गुरुवारी सकाळी येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याबाबत भाष्य केलं. “25 जुलैला हायकमांडकडून मला नोटीस मिळणार आहे. त्यानुसार मी पुढचा निर्णय घेईन. पक्ष मजबूत करणे आणि पुढील निवडणुकांमध्ये पक्षाला पुन्हा सत्तेत आणणे, या दृष्टीने माझी पुढची वाटचाल असेल. मी दिवसरात्र त्यासाठीच मेहनत करत असतो, कृपया सहकार्य करा” असं वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी केलं.

बीएस येडियुरप्पा यांचं ट्वीट

बीएस येडियुरप्पा यांनी बुधवारी रात्री ट्वीट करुन केंद्रीय नेतृत्वाला अप्रत्यक्ष इशारा दिल्याची चर्चा होती. “भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता असल्याचा मला अभिमान आहे. पक्षाच्या आदेशाचं पालन करत सेवा करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. माझ्या सहकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी पक्षशिस्तीचं पालन करावं. आंदोलन किंवा बेशिस्तीचं दर्शन घडवून पक्षाला लज्जास्पद ठरणारं वर्तन करु नये” असं ट्वीट त्यांनी केलं होतं.

येडियुरप्पा सरकारची दोन वर्ष

26 जुलैला येडियुरप्पा सरकार दोन वर्ष पूर्ण करणार आहे. मात्र नेतृत्व बदलाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर बीएस येडियुरप्पा यांनी भाजप आमदारांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनालाही स्थगिती दिली आहे. येत्या रविवारी एका आलिशान हॉटेलमध्ये डिनर आयोजित करण्यात आलं होतं. गेल्या आठवड्यात बीएस येडियुरप्पा यांनी दिल्ली दौरा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. त्यावेळी मात्र येडियुरप्पांनी नेतृत्वबदलाच्या चर्चा धुडकावून लावल्या होत्या.

काँग्रेस सरकार उलथवून भाजप सत्तेत

नाट्यमय घडामोडींनंतर कर्नाटकातील एचडी कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांचं सरकार 23 जुलै 2019 रोजी कोसळलं होतं. विश्वासदर्शक ठरावावेळी कर्नाटक विधानसभेत कुमारस्वामी बहुमत सिद्ध करु शकले नव्हते. यामुळे कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळून भाजपचं सरकार आलं. बहुमत चाचणीमध्ये सरकारच्या बाजूने फक्त 99 मतं तर विरोधात 105 मतं पडली होती. बीएस येडियुरप्पा यांनी 26 जुलै 2019 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

संबंधित बातम्या :

येडियुरप्पा राज्यपालांच्या भेटीला, शपथविधी आटोपण्याची तयारी

कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना होणार; मुख्यमंत्री येडियुरप्पांचा मोठा निर्णय

(Karnataka Chief Minister BS Yediyurappa gives hint to step down as CM)

Non Stop LIVE Update
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं..
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्....
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?.
मोदी Vs गांधींची लढाई, ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो
मोदी Vs गांधींची लढाई, ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो.
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले...
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले....
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास.
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय.
जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा, सभेची जय्यत तयारी, अवघं जालना भगवंमय
जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा, सभेची जय्यत तयारी, अवघं जालना भगवंमय.
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक...
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक....