DGP रँकचा IPS अधिकारी त्याच्या चेम्बरमध्येच महिलांसोबत.. Video बाहेर येताच मुख्यमंत्री संतापले

DGP रँकचा IPS अधिकाऱ्याचे अनेक महिलांसोबत नको त्या अवस्थेतील व्हिडीओ सर्वत्र व्हायरल... व्हिडीओ समोर येताच मुख्यमंत्री संतापले...

DGP रँकचा IPS अधिकारी त्याच्या चेम्बरमध्येच महिलांसोबत.. Video बाहेर येताच मुख्यमंत्री संतापले
Ramachandra Rao
| Updated on: Jan 20, 2026 | 11:34 AM

नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची असते. पण अनेक ठिकाणी रक्षकच भक्षक झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. आता देखील असंच काही घडलं आहे. एका पोलीस अधिकाऱ्याचे देखील व्हिडीओ आता समोर आले आहेत. अनेक महिलांसोबत आक्षेपार्ह वर्तन करताना आता IPS अधिकाऱ्यांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. IPS अधिकाऱ्यांच्या व्हिडीओमुळे आता सर्वत्र खळबळ माजली आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील यावर संताप व्यक्त केला आहे. एवढंच नाही तर, IPS अधिकाऱ्यांनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे.

कर्नाटकात पोलिस महासंचालक (डीजीपी) रँकचे आयपीएस अधिकारी रामचंद्र राव यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये राव त्याच्या कार्यालयात कही महिलांसोबत आपत्तिजनक अवस्थेत दिसत आहेत . असा दावा केला जात आहे की हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत चेंबरमध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे. त्यामध्ये राव वेगवेगळ्या महिलांना मिठी मारताना आणि किस करताना दिसत आहेत.
रामचंद्र राव हे कर्नाटक पोलिसांमध्ये नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाचे डीजीपी आहेत. पण त्यांच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओबद्दल अद्याप कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद्र राव यांनी व्हिडीओ खोटा असून मोर्फ केल्याचं सांगितलं आहे… काही लोक जाणूनबुजून त्यांना लक्ष्य करत आहेत, असं देखील त्यांनी सांगितलं.

 

रामचंद्र राव म्हणाले, ‘मी आठ वर्षांपूर्वी बेलागावी येथे होती… ही फार जुनी गोष्ट आहे. याबद्दल मी माझ्या वकिलांसोबत बोललो आहे आणि आम्ही कारवाई करत आहोत. हे माझ्यासाठी फार धक्कादायक आहे… हे बनावट आणि खोटे आहे. तो व्हिडिओ पूर्णपणे खोटा आहे. मला माहित नाही की काही घडलं आहे की नाही. चौकशीशिवाय हे उघड होणार नाही. या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे. अशी खोटी माहिती पसरवली जात आहे.’

या घटनेमुळे राज्य सरकारवरही दबाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी डीजीपी राव यांच्यावर कारवाई करण्याचे आवाहन केलं आहे. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी देखील संताप व्यक्त केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाकडून माहिती मागवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडीओ पाहिल्यानंतर मुख्यमंत्री संतापलेले होते. त्यांनी याबद्दल माहिती देखील मागितली आहे… पोलीस विभागात अशा घटना का घडत आहेत? असं देखील मुख्यमंत्री म्हणाले.

डीजीपी रामचंद्र राव हे कन्नड अभिनेत्री रान्या राव यांचे सावत्र वडील आहेत, गेल्या वर्षी सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली बेंगळुरू विमानतळावर त्यांच्या मुलीला अटक करण्यात आली होती. आता ते स्वतः व्हिडीओमुळे वादग्रस्त परिस्थितीत अडकले आहेत. आता याप्रकरणी पुढे काय होईल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.