iPhone साठी डिलिव्हरी बॉयची हत्या, तीन दिवस मृतदेह घरात ठेवला

आयफोनच्या क्रेझमध्ये खुनाचा प्रकार कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील अर्सिकेरे शहरात घडला. धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या करणाऱ्या आरोपीचे वय अवघे 20 वर्षे असून हत्या झालेल्या व्यक्तीचे वय 23 वर्षे आहे.

iPhone साठी डिलिव्हरी बॉयची हत्या, तीन दिवस मृतदेह घरात ठेवला
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 9:40 AM

बेंगळुरु : एखाद्याचा खून करण्यासाठी शुल्लक कारण आता पुरेसे असू शकतो. कर्नाटकातून आलेल्या या बातमीनंतर हत्या कोणत्या कारणासाठी होऊ शकते, ते वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कर्नाटकात चक्का आयफोनसाठी (iPhone) डिलिव्हरी बॉयची हत्या (delivery boy murder) केल्याची घटना घडली आहे. मोबाईल घेण्यासाठी पैसे नसल्याने 20 वर्षीय तरुणाने ही हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हत्या करुन आरोपीने डिलिव्हरी बॉयचा मृतदेह तीन दिवस घरात ठेवला होता. त्यानंतर मृतदेह रेल्वे स्थानकाच्या बाजूला जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सर्व प्रकार उघड झाला.

काय आहे प्रकार

आयफोनच्या क्रेझमध्ये खुनाचा प्रकार कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील अर्सिकेरे शहरात घडला. धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या करणाऱ्या आरोपीचे वय अवघे 20 वर्षे असून हत्या झालेल्या व्यक्तीचे वय 23 वर्षे आहे. आरोपी हेमंत दत्ता याला मोबाईल घ्यायचा होता, मात्र त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यासाठी त्याने एक योजना तयार केली. त्याने प्रथम ई-कामर्स वेबसाईटवरून आयफोन ऑर्डर केला.

हे सुद्धा वाचा

17 फेब्रुवारी रोजी 23 वर्षीय डिलिव्हरी बॉय हेमंत नाईक मोबाईल डिलिव्हरी करण्यासाठी आरोपीच्या हेमंत दत्ताचा घरी पोहोचला. हेमंत दत्ताने त्याला थांबण्यास सांगितले. फोन डिलिव्हरी होताच त्याने 46 हजार रुपये भरण्यास सांगितले. डिलिव्हरी बॉय नाईक दारात थांबला होता, मात्र हेमंत दत्ताने त्यांना घरात बोलावून घेतले. तो घरात येताच दत्ताने त्याच्यावर चाकूने वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला.

तीन दिवसानंतर निघाला

खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हे हेमंत दत्ताला समजत नव्हते. त्यामुळे त्याने मृतदेह तीन दिवस घरातच ठेवला होता. तीन दिवसांनंतर संधी मिळाल्यानंतर त्यांनी मृतदेह पोत्याने झाकून स्कूटीवर ठेवला. पहाटे साडेचारच्या सुमारास मृतदेह जाळण्यासाठी निघाला. तो अंककोप्पल रेल्वे स्थानकाजवळील निर्जन भागात गेला. एक जागा निश्चित करून त्याने आपल्या स्कूटीतून मृतदेह काढून जाळला.

सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपी पकडले

हत्येनंतर तीन दिवसांनी मृताचा भाऊ मंजू नाईक यांनी पोलीस ठाण्यात हेमंत नाईक बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक केली.पोलिस चौकशीत हेमंत दत्ताने सांगितले की, डिलिव्हरी बॉय हेमंत नाईकला देण्यासाठी त्याच्याकडे 46 हजार रुपये नव्हते आणि त्याला आयफोनही हवा होता, त्यामुळे त्याने त्याला मारण्याचा कट रचला.

रेल्वे स्थानकाजवळ जळालेला मृतदेह सापडला तेव्हा त्यांनी ते शोधण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमधून शोध घेतला. तेव्हा आरोपी त्याच्या स्कूटीवर मृतदेह घेऊन जाताना दिसत होता.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.