640 किलो सडलेले मांस, बुरशी लागलेल्या भाज्या, अचानक धाड पडली अन् KFC मधील किळसवाणा प्रकार समोर

अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. तुकाराम मुंढे सध्या सगळीकडे छापा मारत आहेत.  अनेक भेसळीचे प्रकार सध्या बाहेर येत आहे. त्यांनी कारवाईचा जोरदार धडाका लावला आहे.

640 किलो सडलेले मांस, बुरशी लागलेल्या भाज्या, अचानक धाड पडली अन् KFC मधील किळसवाणा प्रकार समोर
| Edited By: | Updated on: Aug 20, 2026 | 10:38 AM

अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. तुकाराम मुंढे सध्या सगळीकडे छापा मारत आहेत.  अनेक भेसळीचे प्रकार सध्या बाहेर येत आहे. त्यांनी कारवाईचा जोरदार धडाका लावला आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनानकडून (FDA) अनेक धाडसत्र  सुरू असून त्यांमुळे अनेकांचे परवाने रद्द झाले आहेत. याचा परिणाम आता सर्वत्र पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशभरात याची जोरदार चर्चा असून देशभरातील अनेक आउटलेटवर याचा परिणाम दिसत आहे. अशाच परिणाम आता कर्नाटकात पाहायला मिळाला आहे.

अन्न सुरक्षा विभागाने कर्नाटकातील मंगळुरू येथील प्रसिद्ध फास्ट फूड चेन केएफसीच्या एका आउटलेटवर अचानक छापा टाकला. के. एस. राव रोडवरील सिटी सेंटर मॉलमध्ये असलेल्या केएफसी आउटलेटवर हा छापा टाकण्यात आला. ऑनलाइन मागवलेले चिकन खराब आणि दुर्गंधीयुक्त असल्याची तक्रार एका ग्राहकाने केली होती, त्यामुळे अधिकाऱ्यांच्या पथकाने तपास सुरू केला. छाप्यादरम्यान, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी आउटलेटचे स्वयंपाकघर, स्टोअररूम आणि कोल्ड स्टोरेज क्षेत्राची कसून तपासणी केली. आढळून आलेल्या अनियमिततेमुळे, अधिकाऱ्यांनी तात्काळ आउटलेटचे गोदाम सील केले.

Loading...

अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून चिकन आणि इतर खाद्यपदार्थांचे नमुने गोळा केले. हे सर्व नमुने तपासणीसाठी सरकारी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सविस्तर प्रयोगशाळा चाचणी अहवाल मिळाल्यानंतर नियमांनुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही आस्थापनेला सोडले जाणार नाही.

तीन दिवसांपूर्वी अन्न सुरक्षा विभागाच्या 30 पथकांनी बंगळूरू येथील सुमारे 60 आलिशान हॉटेल्समध्ये अचानक तपासणी केली होती. छाप्यादरम्यान, हॉटेलच्या स्वयंपाकघरांमधून आणि स्टॉरेजमधून 640 किलोग्रॅम सडलेले मांस, चिकन आणि मासे, 276 किलोग्रॅम बुरशी लागलेल्या भाज्या आणि 49 लिटर पुनर्वापर केलेले तेल जप्त करण्यात आले. मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली दुग्ध उत्पादने, बेकरीचे पदार्थ आणि सॉसदेखील जप्त करण्यात आले. अधिकाऱ्यांनी अन्नाचे 77 हून अधिक नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आणि एक टनाहून अधिक खराब झालेले अन्न जागेवरच नष्ट केले.

केएफसीचं स्पष्टीकरण-

याप्रकरणी केएफसीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. ‘सध्या पसरवली जाणारी माहिती ही वस्तुस्थिती दर्शवत नाही. ग्राहकांना दर्जेदार अन्न देण्यासाठी आम्ही देशभरातील नामांकित पुरवठादारांकडून उच्च दर्जाचं चिकन मिळवतो. आम्ही FSSAI च्या मार्गदर्शक तत्त्वांसह जागतिक दर्जाच्या गुणवत्ता मानकांचंही काटेकोरपणे पालन करतो. आम्ही वापरत असलेले आणि साठवलेले चिकन विहित नियमांनुसार असतं. ते दररोज रेस्टॉरंटमध्येच तयार केलं जातं. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहोत आणि लागू असलेल्या कायदेशीर आणि नियामक तरतुदींनुसार या प्रकरणाचा आढावा घेत आहोत.’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us