AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुट्टे पैसे नाही, खाली उतरा; परिवहन मंत्र्यालाच बसमधून उतरवलं, चालक आणि कंडक्टर दोन्ही निलंबित

Karnataka minister viral video : कर्नाटकातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुट्टे पैसे नसल्याने परिवहन मंत्र्याला बसमधून उतरवलं आहे.

सुट्टे पैसे नाही, खाली उतरा; परिवहन मंत्र्यालाच बसमधून उतरवलं, चालक आणि कंडक्टर दोन्ही निलंबित
| Updated on: Jul 12, 2026 | 4:08 PM
Share

कर्नाटकातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्नाटकातील परिवहन मंत्री बायराथी सुरेश यांनी शनिवारी रात्री अनेक बसची पाहणी केली. या पाहणीदरम्यान मंत्री सुरेश यांनी सर्वसामान्य प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांचं निरीक्षण केलं. त्यांनी स्वत: बसमधून प्रवास करून अनुभव घेतला. एका बसची पाहणी करण्यासाठी तोंडाला मास्क लावून बसमध्ये चढले. तोंडावरील मास्कमुळे त्यांना बसमध्ये कोणीच ओळखलं नाही. मात्र, याच प्रवासादरम्यान त्यांना धक्कादायक प्रकाराला सामोरे जावे लागले.

मंत्री बायराथी सुरेश यांनी हेब्बल ते नागशेट्टीहल्लीपर्यंत बीएमटीसी बसने प्रवास केला. ते बसमध्ये चढले. त्यानंतर त्यांनी दोन तिकीटे मागितली. त्यांनी बस कंडक्टरकडे 100 रुपयांची नोट दिली. परंतु कंटक्टरने त्यांच्याकडे सुट्टे पैसे मागितले. मंत्र्याने सुट्टे पैसे नसल्याचे सांगितले. त्यानंतर कंडक्टरने मंत्र्याला बसमधून उतरण्यास सांगितले. तोंडाला मास्क घातलेल्या मंत्री सुरेश यांनी बसमध्ये कोणीही ओळखलं नाही. ते कंटक्टरला काहीच न बोलता बसमधून उतरले. त्यानंतर पुढील काही वेळेत बस चालक आणि कंडक्टर निलंबित झाले.

कोणत्या मार्गावरून केला प्रवास?

मास्क घालून मंत्री सुरेश यांनी जयमहल, टीव्ही टॉवर, आरटी नगर, सीबीआय रोड, हेब्बल, मान्यता टेक पार्क, नागावरा, हेन्नूर, हेन्नूर बांडे, बायरथी बांडे आणि गेद्दलहल्ली या मार्गांवरून सांयकाळी 7 ते 9 दरम्यान प्रवास केला. मंत्री सुरेश यांनी पुढे नागशेट्टीहळ्ळीतून रिक्षाने प्रवास केला. तिथेही त्यांना चांगला अनुभव आला नाही. रिक्षाचा मीटर हा 30 रुपये दिसत होता. परंतु रिक्षा चालकाने 36 रुपयांची मागणी केली. त्यानंतर रिक्षाचालकाला मीटर कधी दुरुस्त करणार असल्याचे विचारले, त्यानंतर चालकाने लवकरच मीटर दुरुस्त करणार असल्याचे सांगितले. मंत्री सुरेश यांनी रिक्षा चालकाला 40 रुपये दिले. त्यानंतर रिक्षातून उतरले. तत्पूर्वी, मंत्री सुरेश यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांचा व्हिडिओ पाहून सर्वसामान्य लोक देखील त्यांचे कटु अनुभव शेअर करू लागले आहेत. अनेकांनी या प्रकरणी कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे