नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी बायकोने व्रत ठेवलं, पण त्या बिचारीचं आयुष्य असं संपेल कोणाला वाटलं नव्हतं, मन सुन्न करणारी घटना

अशारानी यांचा पंजाबी गाण्यावर डान्स सुरु होता. त्या गाण्याचे शब्द होते, ‘मौज मस्तीएं मान, पता नहीं की होना…कल सुबा नू की होना यार, पता नहीं की होना…’

नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी बायकोने व्रत ठेवलं, पण त्या बिचारीचं आयुष्य असं संपेल कोणाला वाटलं नव्हतं, मन सुन्न करणारी घटना
karwa chauth
| Updated on: Oct 15, 2025 | 3:14 PM

दोन दिवसांपूर्वी देशभरात महिलांनी करवा चौथच व्रत ठेवलं होतं. पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत ठेवलं जातं. संपूर्ण दिवस महिला नर्जळी उपवास ठेऊन पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. पण समजा, व्रत सोडण्याआधीच पत्नीचा मृत्यू झाला? तर त्या पतीची काय अवस्था होत असेल?. पंजाबच्या बनरनालामध्ये अशीच एक दु:खद घटना घडली आहे. महिलेचा करवा चौथच्या दिवशी मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सर्वांची रडून, रडून वाईट अवस्था आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण बरनालाच्या तपा मंडी बाग कॉलनीच आहे. तिथे राहणाऱ्या तरसेम लाल यांच्या पत्नीने त्यांच्यासाठी करवा चौथच व्रत ठेवलेलं. 59 वर्षांच्या आशा रानी या संपूर्ण दिवस निर्जळी उपवास ठेवला. संध्याकाळी पूजेच्यावेळी सगळे नातेवाईक एकत्र गोळा झालेले. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबातील दुसऱ्या महिलांनी करवाचौथला चंद्राची पूजा करण्याआधी गाण्यांवर डान्स केला.

पता नहीं की होना…

अशारानी यांचा पंजाबी गाण्यावर डान्स सुरु होता. त्या गाण्याचे शब्द होते, मौज मस्तीएं मान, पता नहीं की होना…कल सुबा नू की होना यार, पता नहीं की होना…’ या गाण्यावर डान्स करताना अशारानी अचानक खाली कोसळल्या. नातेवाईकांनी त्यांना उचललं व लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. हॉस्पिटलमध्ये जाण्याआआधी अशा रानी यांनी प्राण सोडले होते. अशा रानी यांच्या अचानक मृत्यूमुळे सर्वत्र असलेलं आनंदाचं वातावरण दु:खात बदललं.

मृत्यू कशामुळे झाला?

आशा रानी एक समाजसेविका होत्या. त्या नेहमी प्रत्येकाच्या मदतीसाठी तयार असायच्या. व्रत सोडण्याआधी नृत्य करताना आनंदात असताना अचानक त्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोगमग्न वातावरण आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला.