6 कोटींच्या बेंटले कारची डिलिव्हरी घेण्यास व्यापारी चक्क हॅलिकॉप्टरने पोहचला, व्हिडीओ व्हायरल

आता ग्राहक केळ महागड्या कार खरेदी करीत नाहीत तर त्याची डिलिव्हरी देखील शानदारपणे कायम आठवणीत राहील अशा प्रकारे करीत असून समाजमाध्यमांवर अशा प्रकारचे व्हिडीओ टाकत आहेत.असा नवाच ट्रेंड अलिकडे पाहायला मिळत आहे.

6 कोटींच्या बेंटले कारची डिलिव्हरी घेण्यास व्यापारी चक्क हॅलिकॉप्टरने पोहचला, व्हिडीओ व्हायरल
| Updated on: May 25, 2025 | 7:12 PM

भारताला अब्जाधीशांचे माहेर असलेला गरीब देश असे केले जाते. कारण भारतातील अब्जाधीशांची यादीत वाढतच चालली आहे. अनेक जण परदेशातही गेलेले आहेत. आता या अब्जाधीशांच्या कारप्रेमाचे सर्वांचे कौतूक असते. आलिशान कार खरेदी करण्यात या अब्जाधीशांचे कोणी हात धरु शकत नाहीत. भारतातील आणखी एका अब्जाधीशांची जीवनशैली आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ताजे प्रकरण केरळ येथील मलप्पुरम जिल्ह्यातील आहे. येथे एका उद्योजकाने त्याची नवीन बेंटले कारची ( EWB लक्झरी SUV) डिलिव्हरी घेण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरने शोरुम गाठल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हॅलिकॉप्टरने डिलिव्हरी घेण्यास पोहचला

कार क्रेजी इंडियाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ मलप्पुरमचे एक व्यावसायिक पोलँड मुसा ( मुसा हाजी ) यांचा आहे. त्यांनी नुकतीच नवीन बेंटले बेंटायगा ही कार विकत घेतली. परंतू या कारची डिलिव्हरी घेण्यासाठी या व्यावसायिक चक्क हेलिकॉप्टरने शोरुमला पोहचला. मुसा हाजी हे ‘Fragrance World’ नावाच्या एका लग्झरी परफ्यूम कंपनीचे मालक आहेत. ही कंपनी पुरुष आणि महिलांसाठी प्रीमियम फ्रेंगरन्स प्रोडक्ट्स तयार करते.

येथे पाहा व्हिडीओ –

व्हिडीओच्या सुरुवातीला एक हेलिकॉप्टर मलप्पुरमच्या एका आलिशान बंगल्यावरुन उडताना आपल्याला दिसते. जमीनीवर बंगल्याच्या आवरातून तीन लक्झरी कार दिसतात. यात एक रेंज रोव्हर, एक लँड रोव्हर डिफेंडर ११० आणि एक टोयोटा लँड क्रुझर असा ताफा आपल्याला दिसतो. हेलिकॉप्टर एका मैदानावर उतरवतो. तेथे निळ्या कपड्यात कव्हर केलेली आलिशान बेंटले बेंटायगा कार दिसते. मुसा हाजी आणि त्याचे साथीदार हे कापड हटवून कारचे उद्घाटन करताना दिसतात.समोर रोझ गोल्ड शेटमधली आलीशान चमचमती बेंटले बेंटायगा नजरेस पडले.

बेंटले बेंटायगा EWB ची खासियत काय ?

ही काही साधारण बेंटायगा कार नाही. ही एक्सटेंडेड व्हीलबेस (EWB) वाली सिग्नेचर एडिशन आहे. हीची किंमतच 6 कोटी रुपयांपासून सुरू होते.हीचे इंटेरियर टॅन आणि बेझ कलरमध्ये कस्टमाइज्ड आहे. आणि यात एअरलाईन-स्टाईल सीट्स, क्लायमेट कंट्रोल सिस्टम आणि पॉवर-असिस्टेट दरवाजे या सारखे लक्झरी फिचरची सुविधा आहे.

या SUV मध्ये 4.0-लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिन लावलेले आहे, जे 550 PS पॉवर आणि 770 Nm टॉर्क उत्पन्न करते. हे रोल्स-रॉयस कलिनन आणि मर्सिडीज-मेबॅक GLS600 सारख्या हाय-एंड कारना स्पर्धा देणारे इंजिन आहे.