AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nipah virus | देशात पुन्हा व्हायरसची दहशत, एक रुग्ण 950 लोकांच्या संपर्कात, ‘या’ ठिकाणी बंद

Nipah virus | व्हायरसमुळे आतापर्यंत किती रुग्णांचा मृत्यू?. देशातील एका राज्यात निपाह व्हायरसने दहशत निर्माण केली आहे. या व्हायरसमुळे संक्रमित रुग्णांची संख्या किती आहे? ते जाणून घ्या.

Nipah virus | देशात पुन्हा व्हायरसची दहशत, एक रुग्ण 950 लोकांच्या संपर्कात, 'या' ठिकाणी बंद
Nipah Virus
| Updated on: Sep 15, 2023 | 12:45 PM
Share

कोझिकोडे : केरळमध्ये निपाह व्हायरसची लागण झालेल्या आणखी एका रुग्णाची ओळख पटली आहे. केरळमध्ये निपाहने संक्रमित असलेल्या रुग्णांची संख्या 6 झाली आहे. राज्य सरकारसाठी दिलासा देणारी सुद्धा एक बाब आहे. तपासणीसाठी जे 11 सॅम्पल पाठवले होते, ते निगेटिव्ह आले आहेत. निपाह व्हायरसमुळे आतापर्यंत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. संक्रमण वाढू नये. म्हणून सरकारने अनेक पावलं उचलली आहेत. राज्यातील कोझिकोड जिल्हा निपाह व्हायरसच्या प्रकोपाने प्रभावित आहे. 30 ऑगस्टला एका 47 वर्षीय रुग्णाचा निपाह व्हायरसमुळे मृत्यू झाला. त्यानंतर केंद्र सरकारही अलर्ट मोडवर आहे. निपाह व्हायरसचा सामना करण्यासाठी नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल, आरएमएल रुग्णालय आणि नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेजने टीम बनवली आहे.

ही टीम केरळ सरकारला व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी मदत करेल. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने बायोसेफ्टी लेवल-3 कंटोनमेंट मोबाइल लेबोरेट्री तयार केली आहे. जिल्हा स्तरावर व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही टीम मदत करेल. वेळीच व्हायरसला नियंत्रणात आणण्यासाठी ही पावलं उचलण्यात आली आहेत. 2018 नंतर चौथ्यांदा निपाह व्हायरसचा प्रकोप वाढलाय. राज्यातील शाळा आणि कार्यालय बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. कोझिकोडमध्ये प्रभावित ग्राम पंचायतींना क्वारंटीन झोन म्हणून घोषित करण्यात आलय. निपाह व्हायरसने प्रभावित 47 वर्षीय रुग्णाची ओळख पटवण्यात आली. त्याच्या संपर्कात आलेल्या 15 रुग्णांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. शाळा-कॉलेजेस बंद

ग्रामपंचायतीमध्ये आतापर्यंत संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 950 लोकांची ओळख पटवण्यात आली आहे. यात 213 रुग्ण हाय-रिस्क कॅटेगरीतील आहेत. 287 स्वास्थ सेवा देणारे कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आहेत. चार हाय-रिस्क लोकांना खासगी रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे. केरळमधील निपाह व्हायरचा प्रकोप लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हाय-लेव्हल मीटिंग घेतली आहे. यात कोझिकोड जिल्हा प्रशासनाचे अधिकारी होते. धोका लक्षात घेऊन, राज्य सरकारने जिल्ह्यातील शाळा-कॉलेजेस बंद केले आहेत. आधी 14-15 सप्टेंबरला शाळा बंद ठेवण्याचा आदेश होता. आता 16 सप्टेंबरपर्यंत शाळा बंद राहतील.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?