Todays Gold Rate : सोने उच्चांकावरून स्वस्त, जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे नवीन दर..

Todays Gold Rate : इराण आणि अमेरिका युद्ध सुरू झाल्यापासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण बघायला मिळत आहे. आज पुन्हा उच्चांकावरून सोने स्वस्त राहिल्याचे बघायला मिळत आहे. जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे भाव.

Todays Gold Rate : सोने उच्चांकावरून स्वस्त, जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे नवीन दर..
Gold price today
| Updated on: Mar 27, 2026 | 10:00 AM

इराण आणि अमेरिका युद्धात सतत सोन्या चांदीचे भाव बदलताना दिसत आहेत. इराण आणि अमेरिका युद्ध सुरू झाल्यानंतर 2 लाखाच्या आसपास गेलेल्या सोन्यामध्ये मोठी घसरण बघायला मिळाली. 22 कॅरेटचे भाव थेट 1 लाख 28 हजारांपर्यंतही पोहोचले. 6 एप्रिलपर्यंत कोणताही हल्ला केला जाणार नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केल्यानंतर आता पुन्हा एकदा सोन्याचे भाव वधारताना दिसत आहेत. काल सोन्याचे भाव घसरले होते, आज पुन्हा सोन्याने डोकेवर काढल्याचे बघायला मिळत आहे. मात्र, आपल्या उच्चांकावरून आजही सोने स्वस्तच आहे. आज 27 मार्च 2026 रोजी सोने आणि चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. एमसीएक्सवर सोन्याचा भाव 1200 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 1,40,780 रुपये झाला आहे. हीच स्थिती चांदीचीही आहे. चांदीच्या भावातही वाढ झाली. एमसीएक्सवर सकाळी 9 वाजून 10 मिनिटाला चांदीचा नवीन दर प्रति किलोग्राम 2,24,120 रुपये आहे. कालच्या तुलनेत सोने आणि चांदी दोघांचेही भाव वाढले आहेत.

सोने आणि चांदीचे भाव युद्धादरम्यान वाढले असले तरीही दुसरीकडे शेअर मार्केट पडल्याचे दिसत आहे. या युद्धाचा भारतीय शेअर मार्केट आणि सोने चांदीच्या दरावर फरक पडला आहे. जोपर्यंत युद्ध थांबणार नाही, तोपर्यंत सोने आणि चांदीचे दर कमी राहतील, असा अंदाज होता. पण आता दरात दर वाढताना दिसत आहेत.

काल सोन्याचे दर पडले होते. पण आज सोन्याने झेप घेतल्याचे बघायला मिळतंय. 26 मार्चला 10 ग्रॅम सोन्यासाठी जीएसटीसह 1 लाख 47 हजार 290 रुपये मोजावे लागत होते, आता त्यामध्येच 1200 ने वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी सोने घसरले होते, त्यावरून अंदाज होता की, सोन्याची ही घसरण सुरूच राहिल.

पण प्रत्यक्षात तसे घडले नाही, उलटे आज सोन्याने मोठी झेप घेतली आहे. मागील काही दिवसांचा विचार करता तशा सोन्याच्या किमती कमी झाल्या आहेत. सोने उच्चांकावरून तसे स्वस्त झाले आहे. पुढील काही दिवसात युद्ध थांबले तर पुन्हा एकदा सोन्याचे दर वधारतील, असा अंदाज आहे. इराण आणि अमेरिका युद्धामुळे जागतिक बाजारपेठ अस्थिर झाली असून सतत सोने आणि चांदीच्या किमतीत चढउतार बघायला मिळत आहे.

Follow Us