देश सुन्न! कोलकाता शहरात दूर्गापूजेत मोठी चेंगराचेंगरी, तब्बल 17 जणांचा मृत्यू

कोलकात्यामध्ये भयंकर घटना घडली आहे. दूर्गापूजेसाठी जमलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. येथे चेंगराचेंगरी झाली असून 17 जणांचा मृत्यू झालाय.

देश सुन्न! कोलकाता शहरात दूर्गापूजेत मोठी चेंगराचेंगरी, तब्बल 17 जणांचा मृत्यू
kolkata durga puja stampede
Image Credit source: ANI
| Updated on: Oct 17, 2026 | 10:26 PM

Kolkata Durga Puja Stampede : पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात धक्कादायक घटना घडली आहे. दूर्गापूजेचा उत्सव साजरा करण्यासाठी जमा झालेल्या लोकांवर काळाने घाला घातलाय. दूर्गापूजेच्या उत्सवात शेकडो लोक सहभागी झाले होते. परंतु येथे अचानक चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमुळे 17 जणांचा मृत्यू झालाय. तब्बल 40 पेक्षा जास्त लोक जमखी झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर संपूर्ण देश हादरला आहे.

घटना नेमकी कशी घडली?

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार कोलकाता शहरात सप्तमीच्या संध्याकाळी ही दुर्दैवी घटना घडली. येथे दूर्गापूजेसाठी आलेल्या लोकांची अडचण होऊ नये म्हणून मोठा मंडप टाकण्यात आला होता. या मंडपाचा काही भाग अचानक कोसळला. मंडप कोसळल्यानंतर लोकांनी मोठ्या प्रमाणात धावपळ केली. परिणामी पुढच्याच काही क्षणात मोठी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 17 जणांचा मृत्यू झाल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. मृतांचा हा आकडा आणखी वाढू शकतो. 40 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.

Loading...

मुख्यमंत्र्यांची रुग्णालयात धाव, बचावकार्य सुरू

ही घटना समोर येताच मदतकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. घटनास्थळी रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत. बचावकार्य केले जात आहे. जखमी भाविकांना रुग्णालयात दाखल केले जात आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी रुग्णालयात धाव घेतली असून जखमींची विचारपूस केली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत मुख्य सचिव मनोज अग्रवाल हेदेखील कोलकाता शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचले आहेत. दुसरीकडे ही घटना घडताच माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दु:ख व्यक्त केले. जखमी झालेल्या भाविकांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना त्यांनी केली. तसेच अशा कठीण काळात मी मृतांच्या कुटुंबीयांसोबत आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

अनेक लोक बेशुद्ध

या घटनेत जखमी झालेल्यांची मदत करण्यासाठी पश्चिम बंगालच्या सरकारने टोल फ्री नंबर जारी केला आहे. 18003455678 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे सरकारने आवाहन केले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार या घटनेत अनेक लोक बेशुद्ध झाले आहेत. काही लोकांना दुचाकीवर बसवून रुग्णालयात नेण्यात आले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us