
भारतातील अनेक राज्यांना सध्या पावसाचा फटका बसला असून पंजाब, हिमाचलमध्ये तर पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. देशात ही परिस्थिती असतानाचा आता हवामान विभागाने दिलेल्या नव्या माहितीमुळे अनेकांच्या चिंतेत भर पडू शकते.सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ‘ला-निना’ची स्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामाना विभागाने वर्तवली आहे. सप्टेंबरपासून ला निना पुन्हा एकदा हवामान आणि हवामानाच्या स्वरूपावर परिणाम करू शकते. त्याच्या प्रभावामुळे काही काळासाठी हवामान तात्पुरते थंड होऊ शकते, परंतु जगाच्या बहुतेक भागात जागतिक तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
सप्टेंबर- ऑक्टोबर या कालावधीत ला- निनाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, ही प्रणाली तटस्थ असल्याने त्याचा फारसा परिणाम जाणवणार नसल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. तसेच नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवासही येत्या दोन तीन आठवड्यांत सुरु होईल त्यामुळे ‘ला निना’चा पावसावरही फारसा परिणाम होणार नाही. प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागात पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा पाच अंश सेल्सिअसने कमी होते. अशी स्थिती निर्माण झाल्यास ‘ला निना’ प्रणाली सक्रिय झाली, असे म्हटले जाते.
महाराष्ट्रावर परिणाम काय ?
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा ऑक्टोबर महिन्यात ला निना सक्रिय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दोन आठवड्यांनी मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरु होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ला निना स्थिती निर्माण झाली तरी त्याचा फारसा परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही. मोसमी पावसाच्या कालावधीत ला निना स्थिती निर्माण झाली तर सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असते. तसेच ही स्थिती जर हिवाळ्यात निर्माण झाली तर थंडीत वाढ होते. मात्र, ही स्थिती सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान निर्माण होणार असल्याने तिचा परिणाम जास्त होणार नाही. एल निनोच्या घटना सामान्यतः एका वर्षापेक्षा जास्त काळ टिकत नाहीत, तर ला निनाच्या घटना एक ते तीन वर्षांपर्यंत टिकू शकतात.
एल निनो आणि ला निनो म्हणजे नक्की काय ?
एल निनो ही स्थिती निर्माण होणे म्हणजे प्रशांत महासागराच्या मध्य आणि आग्नेय भागातील तापमान वाढते. अल निनो त्याच्या तटस्थ अवस्थेत असताना वारे विषुववृत्ताच्या बाजूने पश्चिमेकडे वाहतात आणि दक्षिण अमेरिकेतील उबदार पाणी आशिया खंडाच्या बाजूला घेऊन जातात. मात्र, एल निनो स्थितीवेळी वारे कमकुवत होतात आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. अशा स्थितीत वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहताना उबदार पाण्याचे प्रवाह मध्ये आणि पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरात जाऊन पश्चिम अमेरिकेच्या किनारपट्टीपर्यंत पोहोचतात.
हवामानाची स्थिती विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सर्वसाधारणपणे दोन ते सात वर्षांनी विकसित होतो. तर ला निनाची स्थिती निर्माण होणे म्हणजे प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागात पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा 5 अंश सेल्सिअसने कमी होते. अशी स्थिती निर्माण झाल्यास ‘ला निना’ सक्रिय झाला, असे म्हटले जाते. ‘ला निना’मुळे प्रशांत महासागरात हवेची घनता वाढते, हवा दाट होते.