Kerala Crime : केरळमध्ये पत्नी बदलण्याचे मोठे रॅकेट उद्धवस्त, 7 जणांना अटक, राज्यातील अनेक उच्चभ्रू लोकांचा समावेश

| Updated on: Jan 10, 2022 | 10:16 PM

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण रॅकेट टेलिग्राम आणि इतर ऑनलाइन मेसेंजर अॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून चालते. आधी ते टेलीग्राम आणि मेसेंजर ग्रुपमध्ये सामील व्हायचे आणि नंतर एकमेकांना भेटायचे, असे चांगनचेरीचे डेप्युटी एसपी आर श्रीकुमार यांनी सांगितले.

Kerala Crime : केरळमध्ये पत्नी बदलण्याचे मोठे रॅकेट उद्धवस्त, 7 जणांना अटक, राज्यातील अनेक उच्चभ्रू लोकांचा समावेश
केरळमध्ये पत्नी बदलण्याचे मोठे रॅकेट उद्धवस्त, 7 जणांना अटक
Follow us on

केरळ : केरळमध्ये पत्नी बदलण्याचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. या रॅकेटमध्ये पोलिसांनी केरळमधील कोट्टायम येथून 7 जणांना अटक केली आहे. तर 25 हून लोक पोलिसांच्या निगराणीखाली आहेत. पत्नी बदलण्यासाठी व्हॉट्सअॅप आणि मेसेंजरवर ग्रुप तयार करण्यात आले होते. या ग्रुपमध्ये एक हजार लोकांचा समावेश होता. याप्रकरणी एका महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर या रॅकेटचा भांडाफोड झाला आहे.

एका महिलेने पतीने इतर पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याबद्दल पतीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत सात जणांना केली. याआधीही कायमकुलम येथूनही अशीच एक घटना समोर आली होती.

टेलिग्राम आणि इतर ऑनलाइन मेसेंजर अॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून चालते रॅकेट

या रॅकेटमध्ये शारीरिक संबंधांसाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर देवाणघेवाण केली जात असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण रॅकेट टेलिग्राम आणि इतर ऑनलाइन मेसेंजर अॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून चालते. आधी ते टेलीग्राम आणि मेसेंजर ग्रुपमध्ये सामील व्हायचे आणि नंतर एकमेकांना भेटायचे, असे चांगनचेरीचे डेप्युटी एसपी आर श्रीकुमार यांनी सांगितले. आम्ही तक्रारदाराच्या पतीला अटक केली आहे. यामागे एक मोठे रॅकेट आहे आणि आम्ही तपास करत आहोत. या प्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे, असे श्रीकुमार यांनी नमूद केले.

केरळमधील अनेक उच्चभ्रू वर्गातील लोकांचा रॅकेटमध्ये सहभाग

अटक करण्यात आलेले लोक केरळमधील अलाप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम (अलाप्पुझा, कोट्टायम, एर्नाकुलम) येथील रहिवासी आहेत. राज्यातील अनेक उच्चभ्रू वर्गातील लोक या रॅकेटचा भाग असल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. या रॅकेट प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे, तर २५ हून अधिक लोक पोलिसांच्या निगराणीत आहेत. येत्या काही दिवसांत आणखी अटक होण्याची शक्यता आहे. या रॅकेटचे व्हॉट्सअॅप ग्रुप आणि मेसेंजर ग्रुपमध्ये 1000 हून अधिक सदस्य असल्याचा संशय आहे, असे पोलिसांनी सांगितले. (Large racket to change wife in Kerala, 7 arrested, Including many highbrow people in the state)

इतर बातम्या

Mumbai Crime : अभिनेत्रीचे न्यूड फोटो काढून ब्लॅकमेल करणाऱ्या कास्टिंग डायरेक्टरला अटक

Dombivali Crime: डोंबिवलीच्या टाटा नाका परिसरात गाव गुंडांची दहशत; घरांवर हल्ला, गाड्यांचे केले नुकसान