मोठी बातमी! भारतावर पुन्हा दहशतवादी हल्ला होणार? पाकिस्तानमधील त्या व्हिडीओने खळबळ

मोठी बातमी समोर येत आहे, पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना असलेल्या लष्कर ए तोयबाकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे, या व्हिडीओमुळे आता भारताची चिंता वाढली आहे.

मोठी बातमी! भारतावर पुन्हा दहशतवादी हल्ला होणार? पाकिस्तानमधील त्या व्हिडीओने खळबळ
Hafiz Saeed
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 20, 2026 | 3:39 PM

पाकिस्तानातून मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना असलेल्या लष्कर ए तोयाबाचा एक व्हिडीओ समोर आला आहे, या व्हिडीओने मोठी खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या व्हिडीओमुळे भारताची चिंता देखील वाढू शकते. या व्हिडीओमध्ये दहशतवादी हाफिज सईद याची दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा आणि लष्कर ए तोयबाची राजकीय विंग पाकिस्तान मरकज मुस्लिम लीगचे लोक हे सांगताना दिसत आहेत, की ते सध्या पाण्यात लढण्यासठी तेथील तरुणांना प्रशिक्षण दिलं जात आहे. या व्हिडीओमुळे भारताची चिंता वाढली आहे, कारण भारतावर जेव्हा पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी 26/11 चा हल्ला केला होता, तेव्हा अजमल कसाब आणि सर्व दहशतवादी हे भारतात समुद्राच्या मार्गानेच आले होते. त्यामुळे लष्कर ए तोयबा या लोकांना पाण्यात लढण्याची ट्रेनिंग का देत आहे? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

OsintTV ने यासंदर्भातील एक व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये जो व्यक्ती दिसत आहे, तो व्यक्ती लष्कर ए तोयबाचा कमांडर हरीश डार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तो या व्हिडीओमध्ये माहिती देताना तरुणांना पाण्यात लढण्यासाठी प्रशिक्षण दिलं जात असल्याचं म्हणतो आहे. ज्यामध्ये स्कूबा डाइविंग, स्विमिंग, बोट हँडलिंग आणि रेस्क्टू ड्रिल सारख्या प्रकारांचा समावेश असल्याची माहिती डार देत आहे.

 

एवढंच नाही तर तो पुढे या व्हिडीओमध्ये असं देखील म्हणतो आहे की, आम्ही वॉटर फोर्स तयार करत आहोत, ज्याची चर्चा सध्या भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये देखील सुरू आहे. भारतीय मीडिया या संदर्भात माहिती देत आहे. आतापर्यंत आपण 135 लोकांना बोट चालवण्याचं ट्रेनिंग दिल्याचा दावाही त्याने केला आहे. दरम्यान चिंतेचं कारण म्हणजे भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर सातत्यानं पाकिस्तानमधून भारताबद्दल वादग्रस्त आणि द्वेषपूर्ण वक्तव्य येत आहेत. त्यातच हा व्हिडीओ आता समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.