‘या’ उपायाने तुमच्या घरातील बाथरूममधील वास्तूदोष होतील दूर
तुमच्या घरात बाथरूम वास्तुच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने आर्थिक नुकसान आणि संघर्ष येऊ शकतो. वास्तुदोष टाळण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता. या उपायांमुळे केवळ वास्तुदोष दूर होत नाहीत तर सकारात्मक ऊर्जा देखील वाढते. चला या उपायांबद्दल अधिक जाणून घेऊयात.

आपल्या हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला विशेष महत्व दिले जाते. अशातच आपण आपल्या घरातील प्रत्येक गोष्ट व वस्तू वास्तू नुसार ठेवतो जेणेकरून त्याचा चांगला परिणाम घरावर व घरातील व्यक्तींवर होत असतो. त्यातच तुम्ही जर तुमच्या घरात वास्तु नियमांकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला वास्तु दोषांचा सामना करावा लागू शकतो. ज्यामुळे आर्थिक नुकसान आणि संघर्ष यासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. अशातच घरात जर बाथरूमचा दरवाजा चुकीच्या दिशेला लावलेला असेल किंवा काही वास्तुदोष असतील तर त्या टाळल्या पाहिजेत. कारण बाथरूमचे हे वास्तूदोष तुमच्या समस्या वाढवू शकतात. चला तर मग आजच्या लेखात आपण बाथरूममधील कोणते वास्तू दोष असतात आणि त्यावर कोणते उपाय केले पहिजेत ते जाणून घेऊयात.
वास्तुदोष असा दिसतो
वास्तुशास्त्रात बाथरूम नेहमी घराच्या पश्चिम किंवा वायव्य दिशेला असावे अशी शिफारस केली आहे. घरातील बाथरूम दक्षिण, आग्नेय किंवा ईशान्य दिशेला बांधू नका. जर तुमचे बाथरूम स्वयंपाकघराच्या अगदी विरुद्ध दिशेला असेल तर यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो.
याव्यतिरिक्त जर तुमच्या बाथरूममध्ये नळाचे पाणी सारखे गळत असेल तर तो ताबडतोब दुरुस्त करा. तसेच, बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवा. या नियमांकडे तुम्ही जर दुर्लक्ष केल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.
या गोष्टी लक्षात ठेवा
वास्तुदोष दूर करण्यासाठी बाथरूम नेहमी स्वच्छ ठेवावे. तुम्ही बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली देखील ठेवू शकता, जी वास्तुच्या दृष्टिकोनातून फायदेशीर मानली जाते. बाथरूममध्ये हलक्या रंगाच्या टाइल्स लावा.
याव्यतिरिक्त पुरेसे व्हेंटिलेशन आणि नैसर्गिक प्रकाश येत आहे की नाही हे देखील लक्षात घेणे महत्वाचे आहे. या काही खबरदारी घेतल्यास तुम्हाला वास्तुदोषांपासून मुक्तता मिळू शकते.
हे काम नक्की करा
वास्तुदोष दूर करण्यासाठी तुम्ही बाथरूमच्या कोपऱ्यात कांस्यच्या वाटीत समुद्री मीठ किंवा तुरटी ठेवू शकता, ते वेळोवेळी बदलत राहा. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. वास्तुदोष असल्यास घरात कापूर जाळावा. कापूराचा हा एक फायदेशीर उपाय आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
