AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर तो दिवस आलाच, भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूचा खात्मा, पाकिस्तानात मोठी खळबळ

पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर येत आहे. भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूचा खात्मा झाला आहे. पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दहशतवादी संघटना लष्कर ए तैयबाला मोठा झटका बसला आहे.

अखेर तो दिवस आलाच, भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूचा खात्मा, पाकिस्तानात मोठी खळबळ
लष्कर ए तैयबाच्या टॉप कमांडरचा मृत्यू Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 27, 2026 | 6:43 PM
Share

पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका बसला आहे, लष्कर -ए-तोयबाचा टॉप कमांडर गाजी मुमताज याचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमध्ये संशयास्पदरित्या त्याचा मृतदेह आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. गाजी मुमताज हा गेल्या अनेक वर्षांपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये सक्रिय होता. त्यानंतर भारतीय सैन्याच्या कारवाईच्या भीतीने तो पाकिस्तानमध्ये पाळून गेला होता. त्याला लष्कर -ए तोयबाचा प्रमुख हाफिज सईद आणि पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांकडून सुरक्षा पुरवण्यात आली होती. मात्र आता त्याचा मृत्यू झाला आहे. गाजी मुमताज याचा मृत्यू हा दहशतवादाला मोठा झटका असून, त्याच्या मृत्यूमुळे काश्मीरमधील दहशतवादाचं कंबरडं मोडलं आहे. भारताच्या आणखी एका शत्रूचा खात्मा झाला आहे. दरम्यान गाजीचा नैसर्गिक मृत्यू झाला की त्याची हत्या करण्यात आली? याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये.

हाफिज सईदचा सर्वात विश्वासू

सिसोनेंस न्यूजने दिलेल्या माहितीनुसार गाजी मुमताज याचा काश्मीरमध्ये झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग होता. तो लष्कर ए तोयबासाठी काम करायचा त्यामुळे त्याला लष्कर ए तोयबाकडून ‘गाजी’ ही पदवी देण्यात आली होती. त्यामुळे पुढे तो गाजी मुमताज या नावानेच ओळखला जाऊ लागला. गाजी मुमताज हा पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतामधील बाराहवाल गावचा रहिवासी होता. गाजी मुमताज हा हाफिस सईदचा सर्वात विश्वासू मानला जातो. यामुळेच त्याला पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांकडून सुरक्षा पुरवण्यात आली होती.

लष्कर ए तोयबाचा ट्रेनर

समोर आलेल्या माहितीनुसार गाजी मुमताज हा लष्कर ए तोयबाचा ट्रेनर होता, त्याने अनेक दिवस लष्कर ए तोयबाच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये नव्याने भरती होणाऱ्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्याचं देखील काम केलं, मात्र आता त्याचा खात्मा झाला आहे. त्याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. त्याचा मृत्यू झाला की, त्याची हत्या करण्यात आली? याबाबत अजूनही कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. गाजी मुमताज याच्या मृत्यूमुळे लष्कर ए तैबाला मोठा झटाका बसला आहे.

Follow Us
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर...
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
Mumbai Ganpati Visarjan | गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप