धक्कादायक! प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरला गोळ्या झाडून संपवलं; नेमकं काय घडलं? घटनेचा थरार व्हिडिओत कैद

Mad Sandhu Killed News: मेकअप आर्टिस्ट आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मॅड संधू याची पंजाबमधील अमृतसर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

धक्कादायक! प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरला गोळ्या झाडून संपवलं; नेमकं काय घडलं? घटनेचा थरार व्हिडिओत कैद
| Updated on: Oct 03, 2026 | 9:39 PM

पंजाबमधील अमृतसर येथे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मॅड संधूची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. गोळी लागल्यानंतर मॅड संधू रस्त्यावर कोसळताना दिसला. गोळी लागल्यानंतर रस्त्यावर कोसळलेल्या मॅड संधूचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मॅड संधू रक्ताने माखलेल्या अवस्थेत रस्त्यावर पडलेला आढळला. या व्हायरल व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली आहे. तो एक LGBTQ+ कार्यकर्ता होता. सोशल मीडियावर त्यांच्या स्पष्ट मतांसाठी आणि मेकअप-फॅशन संबंधित मजकुरासाठी ओळखले जात होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अमृतसरमधील या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. इन्फ्लुएन्सर मॅड संधूच्या हत्येनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मॅड संधू एका कामासाठी जात असताना त्याच्यावर गोळीबार झाला. गोळी लागल्यानंतर तो रस्त्यावर कोसळले. आजूबाजूच्या लोकांनी त्याची गंभीर अवस्था पाहून त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

Loading...

मॅड संधू याच्या मृत्यूच्या बातमीने सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक लोकांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे शोक व्यक्त केला आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये मॅड संधू रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला दिसत आहेत. मात्र या घटनेच्या व्हिडिओची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला.

त्यांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यास आणि आजूबाजूच्या लोकांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. या घटनेमागील हेतू अद्याप अस्पष्ट आहे. हल्लेखोरांना ओळखण्यासाठी आणि हत्येमागील हेतू निश्चित करण्यासाठी पोलीस आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. ते मॅड संधूच्या ओळखीच्या व्यक्तींबद्दल आणि घटनेपूर्वी तो ज्यांच्या संपर्कात होता त्यांच्याबद्दलही माहिती गोळा करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us