AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धिरेंद्र शास्त्रीसारखाच आणखी एका बाबाने भरवला दिव्य दरबार, सेम टू सेम पध्दत!

लोकांमध्ये असलेली दिव्य दरबारची क्रेझ पाहाता आता बाबांचीही संख्या वाढू लागली आहे. धिरेंद्र शास्त्रीच्या पाउलावर पाउल ठेवत आता आणखी एका तरूणाने दिव्य दरबार भरवल्याचे समोर आले.

धिरेंद्र शास्त्रीसारखाच आणखी एका बाबाने भरवला दिव्य दरबार, सेम टू सेम पध्दत!
दिव्य दरबार Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Mar 23, 2023 | 3:26 PM
Share

राजगड : सध्या बाबा लोकांची चांगलीच क्रेझ आहे. मोफत वैद्यकीय शिबीरांपेक्षा जास्त गर्दी बाबांच्या दिव्य दरबारात होतांना दिसत आहे. यामध्ये चुक बरोबर हा मुद्दा प्रत्त्येकाच्या मान्यतेनूसार वेगवेगळा आहे. असे असले तरी लोकांना भुरळ घालण्यात बाबा लोकं यशस्वी ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळतेय. धिरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri Divya Darbar) यांचा दिव्य दरबारी चर्चा रंगात असतानाच आता आणखी एका बाबाने सेम टू सेम दरबार लावला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अगदी दुसऱ्या तिसऱ्या दरबारातच या बाबाच्या दरबारात लोकांच्या रांगा लागायला सुरूवात झाली आहे. समस्येने त्रस्त असलेले लोकं तुफान गर्दी करतांना दिसत आहेत.

कुठे भरतोय हा दरबार?

धीरेंद्र शास्त्री यांच्या पावलावर पाउल ठेवत हनुमंत दास नावाच्या तरुण पुजार्‍याने हनुमान मंदिरात दोन दिवस दिव्य दरबार भरवला होता. तिथे प्रचंड गर्दी तर होतीच, पण पुजारीही गर्दीतून लोकांना नावाने हाक मारून समस्या सोडवण्याचे आश्वासन देताना दिसत होते. रविवारी आणि सोमवारी हा दरबार भरतो असे स्थानिकांचे म्हणणे आहे. आता एप्रिलमध्ये पुजाऱ्याचा तीन दिवसीय दरबार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हनुमंत दास 30 वर्षांचे असून वयाच्या 19 वर्षापासून ते देवपूजा करत असल्याचे सांगण्यात येते.

भागवत कथेदरम्यान ग्रामस्थांना माहिती मिळाली

मिळालेल्या माहितीनुसार, जुनागडच्या शिवधाममध्ये गावकऱ्यांनी भागवत कथेचे आयोजन केले होते. याच काळात कथाकार महेश शास्त्री आणि आकाश शास्त्री यांनी दैवी दरबारी हनुमंत दास यांच्याविषयी ग्रामस्थांना सांगितले होते. यानंतर गावकऱ्यांनी हनुमंत दास यांना दरबारासाठी बोलावले. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्यासारखा रविवार आणि सोमवार असे दोन दिवस त्यांनी दिव्य दरबार भरवला. यावेळी कथा मंडपात ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना