Rahul Gandhi: राजीव गांधी यांच्या हत्येच्या उद्देशानेच… राहुल गांधी यांचा मोठा बॉम्ब, काय केला खुलासा, कुणावर निशाणा?

Rahul Gandhi on Rajiv Gandhi: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यांच्या या गंभीर आरोपाने आता वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Rahul Gandhi: राजीव गांधी यांच्या हत्येच्या उद्देशानेच... राहुल गांधी यांचा मोठा बॉम्ब, काय केला खुलासा, कुणावर निशाणा?
राहुल गांधी यांचा मोठा बॉम्ब, काय केला खुलासा, कुणावर निशाणा?
| Updated on: Nov 24, 2026 | 12:19 PM

Rahul Gandhi on Rajiv Gandhi: दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या व्हावी या उद्देशानेच त्यांची सुरक्षा व्यवस्था जाणीवपूर्वक काढण्यात आल्याचा मोठा दावा काँग्रेस नेत्याने केला आहे. सोनिया गांधी यांच्या बिलाँगिंगः अ जर्नी ऑफ लव्ह या आत्मचरित्राच्या निमित्ताने सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान राहुल गांधी यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा खळबळजनक दावा केला.

पप्पांची सुरक्षा हटवणे अपघात नव्हता

Loading...

“पप्पांची सुरक्षा काढून घेतली गेली. जेणेकरून त्यांची हत्या व्हावी. ही सुरक्षा काढणे केवळ एखादा अपघात नव्हता. तर ते जाणीवपूर्वक केले गेले होते. त्यांची हत्या होण्यासाठीच (राजीव गांधी) तसे वातावरण तयार करण्यात आले होते.” असा खळळजनक दावा राहुल गांधी यांनी केला. त्या काळात जे काही घडत होते, ते स्पष्ट दिसत होते. याविषयी आपण आईला सांगितले होते. वडिलांशी सुरक्षेच्या मुद्यावरून या घटनेच्यापूर्वी वादही झाला होता, याची आठवणही राहुल गांधी यांनी सांगितली.

बिहार दौऱ्याची दाहकता

या संवादादरम्यान काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बिहार दौऱ्याची त्यावेळची दाहकता सांगितली. राजीव गांधी त्यावेळी विरोधी पक्षनेते होते. त्या दौऱ्यात राजीव गांधी उघड्या जीपमधून प्रवास करत होते. त्यांच्यावर दगडफेक झाली. तसेच घोषणाबाजी आणि निदर्शने करण्यात आली. हा दौरा अत्यंत भयावह होता, असे सोनिया गांधी या संवादादरम्यान म्हणाल्या. त्यांनी विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये नेत्यांच्या सुरक्षेबाबत उदासीनता दाखवली जाते, अशी चिंताही त्यावेळी व्यक्त केल्याची आठवण सांगितली.

राहुल गांधी यांनी व्यक्त केली ती भीती

सोनिया गांधी यांनी संवादादरम्यान सांगितले की, या बिहार दौऱ्यात राहुल गांधी पूर्णवेळ आपल्या वडिलांसोबत होते. त्यांनी दगडफेक आणि विरोधकांचा तो हंगामा प्रत्यक्ष पाहिला. घरी परतल्यावर राहुल गांधी यांनी अत्यंत अस्वस्थ होऊन म्हटले की, “ममा, जर आपण पप्पांच्या सुरक्षेबाबत काही ठोस पाऊलं टाकली नाहीत, तर मला खात्री आहे की मला लवकरच त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी परत यावे लागेल.” या संवादातून गांधी कुटुंबातील वैयक्तिक आठवणी, राजकीय घडामोडींना उजाळा मिळाला. 21 मे 1991 रोजी तामिळनाडूतील श्रीपेरंबदूर येथे झालेल्या एका आत्मघाती बॉम्बस्फोटात राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. श्रीलंकेतील तत्कालीन लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम या फुटीरतावादी संघटनेने हा हल्ला घडवून आणला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us