AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lpg And Petrol Prices Today : आजचा LPG आणि पेट्रोल-डिझेलचा रेट काय? चेक करा महाराष्ट्राच्या प्रमुख शहरातील लेटेस्ट दर

Lpg And Petrol Prices Today : पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि होर्मुज स्ट्रेटमधील वाहतूक बंद असल्याचा परिणाम एलपीजी पुरवठ्यावर झाला आहे. अलीकडेच घरगुती गॅस सिलेंडर महाग झाला. आखातील देशांवरील आयातीसाठी अवलंबित्व आणि शिपिंगच्या अडचणींमुळे येणाऱ्या दिवसात गॅसच्या किंमती आणि पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.

Lpg And Petrol Prices Today : आजचा LPG आणि पेट्रोल-डिझेलचा रेट काय? चेक करा महाराष्ट्राच्या प्रमुख शहरातील लेटेस्ट दर
Lpg And Petrol Prices Today
| Updated on: Mar 11, 2026 | 11:45 AM
Share

LPG and Petrol price : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा परिणाम आता भारताच्या एनर्जी पुरवठ्यावर दिसू लागला आहे. तेल, LPG आणि LNG सारखे ऊर्जा स्त्रोत भारताच्या वेगाने वाढत्या अर्थव्यवस्थेचा कणा मानले जातात. त्यांच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ लागला आहे. भारताची LPG ची गरज आहे, त्याच्या 60 टक्के आणि LNG ची अर्ध्यापेक्षा जास्त मागणी आयातीच्या माध्यमातून पूर्ण होते. यातला मोठा भाग आखाती देशातून येतो. अशा स्थितीत देशाच्या अनेक भागात LPG चा तुटवडा निर्माण झाल्याच्या बातम्या येत आहेत. आज 11 मार्च आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरात पेट्रोल-डिझेल आणि LPG ची काय किंमत आहे? ते जाणून घ्या.

जियो-पॉलिटिकल टेंशन दरम्यान 7 मार्च रोजी देशभरात घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 60 रुपयांनी वाढवण्यात आली. त्यानंतर दिल्लीत 14.2 किलो बिगर सबसिडीवाल्या घरगुती सिलिंडरची किंमत 913 रुपये झाली. तेच 19 किलो कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत 114-115 रुपयांनी वाढून दिल्लीत 1,883 रुपये झाली.

LPG गॅस दर 

शहरLPG (14.2 KG)कमर्शिअल LPG (19 KG)
मुंबई ₹912.50₹1,836.00
नवी दिल्ली ₹913.00₹1,988.50
चेन्नई ₹928.50₹2,043.50
कोलकत्ता ₹939.00₹1,988.50
बंगळुरु ₹915.50₹1,958.00

सरकारचे निर्देश काय?

पश्चिम आशियात तणाव आहे. त्यामुळे LPG पुरवठा प्रभावित होऊ शकतो. ही बाब ध्यानात घेऊन सरकारने हे पाऊल उचललय. गॅसची कमतरता भासू नये यासाठी सरकराने एस्मा कायदा लावला आहे. रिफायनरी कंपन्यांना LPG उत्पादन वाढवण्याचे निर्दश दिले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरला प्राथमिकता देण्यास सांगितलं आहे. सरकारने काही सेक्टर्सना 100 टक्के गॅस सप्लाय सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

पेट्रोल-डिझेल दर

शहरपेट्रोल (₹/लीटर)डीजल (₹/लीटर)
मुंबई₹104.21₹92.15
नाशिक ₹95.50₹89.50
पुणे ₹104.04₹90.57
नवी दिल्ली ₹94.72₹87.62
अहमदाबाद ₹94.49₹90.17

बुकिंगचे नियमही कठोर केले

त्या शिवाय गॅस सिलिंडरच्या बुकिंगचे नियमही कठोर केले आहेत. घरगुती LPG सिलेंडर घेतल्यानंतर आता पुढची बुकिंग 25 दिवसानंतरच तुम्ही करु शकता. सिलिंडरची साठवणूक आणि काळाबाजार रोखण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...