LPG Shortage: तेलाचा महिन्यांचा साठा, पण गॅसचा का नाही? LPG-LNG च्या साठ्याची गणितं काय?

येत्या काळात भारताला गॅसच्या साठवणीची क्षमता वाढवावी लागेल. त्याचसोबत आयात स्रोतांमध्येही विविधता आणावी लागेल. गॅसच्या बाबतीत देशांतर्गत उत्पादन वाढवावं लागेल, तरच देश ऊर्जा सुरक्षेच्या बाबतीत अधिक मजबूत होऊ शकेल.

LPG Shortage: तेलाचा महिन्यांचा साठा, पण गॅसचा का नाही? LPG-LNG च्या साठ्याची गणितं काय?
LPG and LNG
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 16, 2026 | 11:15 AM

भारतात जेव्हा कधी गॅस सिलिंडरची कमतरता किंवा पुरवठ्यात विलंब झाल्याच्या बातम्या येतात, तेव्हा एक सवाल वारंवार उपस्थित होतो. तो म्हणजे जर भारत कच्चे तेल आणि पेट्रोल-डिझेल महिनोंमहिने साठवू शकतो, तर मग गॅसच्या बाबतीत हे का शक्य होऊ शकत नाही? भारत आता जगातील सर्वांत मोठ्या ऊर्जा अर्थव्यवस्थांपैकी एक बनला आहे, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. परंतु यामागचं वास्तव वेगळंच आहे. तेल आणि गॅस साठवण्याच्या पद्धती पूर्णपणे वेगळ्या आहेत. खर्च, सुरक्षा आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास तेलाच्या तुलनेत गॅसची साठवण करणं खूपच आव्हानात्मक आहे. तेल साठवणं सोपं कसं? कच्चं तेल, पेट्रोल, डिझेल हे सर्व द्रव स्वरुपातील इंधन आहेत. सर्वसामान्य तापमानातही ते द्रव स्वरुपातच राहतात. त्यामुळे मोठ्या टाक्यांमध्ये ते सहजपणे साठवता येतं. भारतासह जगभरातील अनेक देशांनी पेट्रोलियमचे साठे तयार केले आहेत. भारतात विशाखापट्टणम, मंगळुरू आणि पादूर इथं धोरणात्मक दृष्टीकोनातून (कठीण काळात उपयोगी पडेल या दृष्टीने) पेट्रोलियम साठे आहेत. जमिनीखाली मोठ्या खडकांमध्ये...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us