AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ आयफोन्समध्ये व्हॉट्सॲप लवकरच होणार बंद, तुमचा आयफोन यादीत आहे का? आताच जाणून घ्या

व्हॉट्सॲपने iOS वापरकर्त्यांसाठी एक नवीन अंतिम मुदत जाहीर केली आहे. 30 नोव्हेंबर 2026 पासून व्हॉट्सॲप वापरण्यासाठी तुमच्या आयफोनमध्ये iOS 15.5 किंवा त्याहून अधिक आवृत्ती असणे आवश्यक असेल. चला तर मग आजच्या लेखात याबद्दल जाणून घेऊयात.

'या' आयफोन्समध्ये व्हॉट्सॲप लवकरच होणार बंद, तुमचा आयफोन यादीत आहे का? आताच जाणून घ्या
iPhones
| Edited By: | Updated on: Jun 13, 2026 | 2:51 PM
Share

तुम्ही जर आयफोन वापरकर्ते असाल आणि तुमच्या स्क्रीनवर सॉफ्टवेअर अपडेटची सूचना दिसत असेल आणि तुम्ही ‘रिमाइंड मी लेटर’ बटण दाबून ते वारंवार टाळत असाल तर आता तुम्ही तसे करू शकणार नाही. कारण व्हॉट्सॲपने एक नवीन आदेश जारी केला आहे ज्यामध्ये तुम्ही पुढील काही महिन्यांत तुमच्या फोनचे सॉफ्टवेअर अपडेट केले नाही तर तुमचे व्हॉट्सॲप चॅट्स कायमचे बंद होऊ शकते. कंपनीने यासाठी एक अंतिम मुदतही निश्चित केली आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण कोणत्या आयफोनमध्ये व्हॉट्सॲप बंद होणार आहे.

व्हॉट्सॲप त्यांचे फिचर्स आणि सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी वेळोवेळी जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमसाठीचा सपोर्ट बंद करते. याच संदर्भात कंपनीने जाहीर केले आहे की 30 नोव्हेंबर 2026 पासून तुमच्या आयफोनमध्ये व्हॉट्सॲप वापरण्यासाठी किमान आयओएस 15.5 किंवा त्याहून अधिक जास्तीचे व्हर्जन असणे आवश्यक असेल. सध्या व्हॉट्सॲप आयओएस15.1 आणि त्यापुढील व्हर्जनमध्ये चालत आहे, परंतु ही जुने व्हर्जन नोव्हेंबरच्या 30 तारखेपासून काम करणे बंद करेल.

तुमचा आयफोनमध्ये व्हॉट्सॲप नसल्यावर कितपत वापरणे फायद्याचे ठरेल?

व्हॉट्सॲप कोणत्याही आयफोन मॉडेलला पूर्णपणे ब्लॉक करत नाही. तुमचा फोन पूर्णपणे सुरक्षित राहील आणि चालू राहील. तुम्हाला फक्त नोव्हेंबरच्या अंतिम मुदतीपूर्वी तुमच्या आयफोनमधील सेटिंग्जमध्ये उपलब्ध असलेले नवीनतम सॉफ्टवेअर अपडेट करणे आवश्यक आहे.

कोणत्या आयफोन मॉडेल्सवर व्हॉट्सॲपचा परिणाम होईल?

या नवीन बदलाचा परिणाम प्रामुख्याने आयफोन 6s, आयफोन 6s प्लस, आयफोन SE (फर्स्ट जनरेशन), आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसच्या वापरकर्त्यांवर होईल. अशातच ॲपलने या सर्व जुन्या मॉडेल्ससाठी iOS 15.8.8 अपडेट आधीच जारी केले आहे. याचा अर्थ असा की हे सर्व फोन व्हॉट्सॲपच्या नवीन आवश्यकता (iOS 15.5 किंवा त्याहून अधिक) सहजपणे पूर्ण करू शकतात.

तुमचा आयफोन कसा अपडेट करायचा

तुमच्या आयफोनवर व्हॉट्सॲप सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी, तुम्हाला एक सोपी गोष्ट करायची आहे. सर्वप्रथम, तुमच्या आयफोनच्या सेटिंग्जमध्ये जा. ‘जनरल’ पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर, ‘सॉफ्टवेअर अपडेट’ वर टॅप करा. जर अपडेट दिसले, तर व्हॉट्सॲप लगेच डाउनलोड करून इन्स्टॉल करा.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा