AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त 500 रुपये घेऊन मुंबईत आलेली ही अभिनेत्री, ‘धोनी’मुळे एका रात्रीत बनली स्टार, सौंदर्य पाहून..

मुंबईत फक्त 500 रुपये घेऊन आलेली ही अभिनेत्री, आज आहे बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैंकी एक. सौंदर्य आणि फिटनेसमुळे असते प्रचंड चर्चेत .

फक्त 500 रुपये घेऊन मुंबईत आलेली ही अभिनेत्री, 'धोनी'मुळे एका रात्रीत बनली स्टार, सौंदर्य पाहून..
| Updated on: Jun 13, 2026 | 2:51 PM
Share

बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस, फिट आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या दिशा पाटणी हिने आपल्या अभिनय, सौंदर्य आणि फिटनेसच्या जोरावर चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम करत तिने केवळ बॉलिवूडच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही स्वतःची छाप सोडली आहे. 13 जून रोजी दिशा तिचा वाढदिवस साजरा करत असून, तिच्या यशामागील संघर्षाची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते.

खिशात फक्त 500 रुपये घेऊन मुंबईत आगमन

दिशाच्या संघर्षाची सर्वात चर्चित गोष्ट म्हणजे ती अवघे 500 रुपये घेऊन मुंबईत आली होती. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, ती मूळतः पायलट बनण्याचे स्वप्न पाहत होती. मात्र मुंबईतील एका स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर तिला ऑडिशन्सचे फोन येऊ लागले आणि तिच्या आयुष्याला नवे वळण मिळाले. स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी तिने सुरक्षित करिअरचा मार्ग सोडून मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकले आणि याच निर्णयाने तिचे आयुष्य बदलले.

तेलुगू चित्रपटातून पदार्पण

दिशाने अभिनय क्षेत्रात पहिलं पाऊल 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या लोफर या तेलुगू चित्रपटातून टाकले. या चित्रपटात तिने मौनी नावाची भूमिका साकारली होती. अभिनेता वरुण तेज तिच्यासोबत प्रमुख भूमिकेत होता. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. तरीही दिशाने हार न मानता आपले प्रयत्न सुरू ठेवले.

2016 मध्ये दिशाने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. तिचा पहिला हिंदी चित्रपट होता एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी. या चित्रपटात तिने महेंद्रसिंग धोनीची गर्लफ्रेंड प्रियंका झा हिची भूमिका साकारली होती. चित्रपटात तिची भूमिका तुलनेने लहान असली तरी तिच्या अभिनयाने आणि स्क्रीन प्रेझेन्सने प्रेक्षकांची मने जिंकली.

सुशांत सिंह राजपूत आणि कियारा अडवाणी यांच्यासोबत काम करताना दिशाने स्वतःची वेगळी छाप निर्माण केली आणि ती रातोरात चर्चेत आली. त्यानंतर दिशा पाटणीने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.  ज्यामधील तिच्या अभिनयाचे मोठ्या प्रमाणात कौतुक देखील झालं. आजही ती तिच्या सौंदर्य आणि फिटनेसने चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते.

Follow Us
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
Rahul Gandhi | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक...
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं