लेफ्टनंट जनरल बीएस राजू लष्कराचे नवे उपप्रमुख; 1 मे रोजी पदभार स्विकारणार; ते आहेत पट्टीचे हेलिकॉप्टर पायलट

| Updated on: Apr 29, 2022 | 6:04 PM

लेफ्टनंट जनरल बीएस राजू हे 1 मे रोजी या पदाचा पदभार स्वीकारणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

लेफ्टनंट जनरल बीएस राजू लष्कराचे नवे उपप्रमुख; 1 मे रोजी पदभार स्विकारणार; ते आहेत पट्टीचे हेलिकॉप्टर पायलट
लेफ्टनंट जनरल बीएस राजू यांची भारतीय लष्करात उपसेनाप्रमुख म्हणून नियुक्ती
Image Credit source: Twitter
Follow us on

नवी दिल्लीः लेफ्टनंट जनरल बीएस राजू (Lt Gen BS Raju) यांची भारतीय लष्करात उपसेनाप्रमुख (Vice Chief of Army Staff) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय सैन्य दलाकडून हे ट्विट करुन याची माहिती करुन देण्यात आली. लष्कराचे प्रमुख जनरल मनोज मोहन नरवणे यांच्याकडून त्यांच्या या नियुक्तीबद्दल अभिनंदन करण्यात आले आहे. लेफ्टनंट जनरल बीएस राजू हे 1 मे रोजी आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार असल्याची माहितीही सैन्य दलाकडून देण्यात आली आहे.


जाट रेजिमेंटमधून सुरुवात

भारतीय लष्करात (Indian Army) उपसेनाप्रमुख म्हणून ज्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचे नाव लेफ्टनंट जनरल बग्गावल्ली सोमशेकर राजू असे आहे. बग्गावल्ली सोमशेखर राजू यांची यांची 15 डिसेंबर 1984 रोजी जाट रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आल होती. त्यानंतर त्यांनी भारतीय सैन्यात आपल्या कामगिरीने आपली सेवा गाजवली आहे.

38 वर्षांची शानदार सेवा

बग्गावल्ली सोमशेकर राजू असे नाव असणाऱ्या या उपसेनाप्रमुखांने 38 वर्षांच्या आपल्या शानदार कारकिर्दीत खूप महत्वाच्या जबाबदाऱ्याही पार पाडल्या आहेत. बीएस राजू यांनी लष्कराच्या मुख्यालयात अनेक महत्त्वाच्या रेजिमेंट, कर्मचारी आणि निर्देशात्मक नियुक्त्यांवरही त्यांनी काम केले आहे.

एलएसीवरील चीनसोबत संघर्ष

लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी राजू एलएसीवरील चीनसोबतच्या संघर्षाच्या वेळी महासंचालक मिलिटरी ऑपरेशन्स म्हणून कार्यरत होते. त्यांचा हा काळ खूप महत्वाचा मानला जातो.

एक हाडाचे हेलिकॉप्टर पायलट

जनरल असणारे बीएस राजू हे एक हाडाचे हेलिकॉप्टर पायलटदेखील आहेत. त्यांनी सोमालियामध्ये UNOSOM-2 ऑपरेशन म्हणून त्यांनी उड्डाण केले आहे.त्यांनी पायलट म्हणून काम करत असताना त्यांनी जाट रेजिमेंटचे कर्नलही म्हणून काम केले आहे. लेफ्टनंट जनरल राजू यांनी भारतातील सर्व महत्त्वाच्या अभ्यासक्रमांमधून शिक्षण घेतले आहे आणि युनायटेड किंगडमच्या रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीजमधून त्यांनी एनडीसीही केले आहे.

उत्कृष्ट योगदानाबद्दल अनेक गौरव

त्यांनी नेव्हल पोस्ट ग्रॅज्युएट स्कूल, मॉन्टेरी, यूएसए येथे दहशतवादविरोधी विशेष पदव्युत्तर कार्यक्रमाची पदवीदेखील घेतली आहे. सेवेतील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल, त्यांना उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक आणि युद्ध सेवा मेडलने गौरवण्यात आले आहे.