Surya Grahan 2022 : उद्या 2022 मधलं पहिलं सूर्यग्रहण ! एकाच दिवशी सूर्यग्रहण आणि शनी अमावस्या…

शनिवारचा दिवस असल्यामुळे शनी अमावास्येचा अनोखा योग यावेळी आलाय. नासा ने दिलेल्या माहितीनुसार, 30 एप्रिलच्या ग्रहणादरम्यान सूर्याच्या प्रतिमेचा 64 टक्के भाग चंद्रापासून ब्लॉक होणार आहे. वर्षातील पहिलं सूर्यग्रहण उद्या आणि दुसरं सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर 2022 रोजी असणार आहे.

Surya Grahan 2022 : उद्या 2022 मधलं पहिलं सूर्यग्रहण ! एकाच दिवशी सूर्यग्रहण आणि शनी अमावस्या...
उद्या 2022 मधलं पहिलं सूर्यग्रहण ! Image Credit source: facebook
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 5:46 PM

उद्या 30 एप्रिल 2022 रोजी वर्षातील पहिलं सूर्यग्रहण (First Solar Eclipse) असणार आहे. हे सूर्यग्रहण अनेक अर्थांनी खूप खास असणार आहे. 30 एप्रिल रोजी भारतीय वेळेनुसार (Indian Standard Time) दुपारी 12.15 वाजेपासून हे सूर्यग्रहण सुरु होईल आणि पहाटे 4.07 वाजेपर्यंत सुरु राहील. हे अर्धवट ग्रहण (आंशिक ग्रहण) असणारे. वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहण खूप महत्त्वाचं मानलं जातं. हिंदू (Hindu) पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या अमावस्या तिथीला हे ग्रहण असणार आहे. शनिवारचा दिवस असल्यामुळे शनी अमावास्येचा अनोखा योग यावेळी आलाय. नासा ने दिलेल्या माहितीनुसार, 30 एप्रिलच्या ग्रहणादरम्यान सूर्याच्या प्रतिमेचा 64 टक्के भाग चंद्रापासून ब्लॉक होणार आहे. वर्षातील पहिलं सूर्यग्रहण उद्या आणि दुसरं सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर 2022 रोजी असणार आहे.

सूर्यग्रहणाची भारतीय वेळ

वर्षातील पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिलच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजून 15 मिनिटांपासून सुरु होईल आणि पहाटे 4 वाजून 7 मिनिटांपर्यंत चालेल. ही ग्रहणे अर्धवट (आंशिक) असतील. म्हणजेच चंद्रामुळे सूर्यप्रकाशाचा काही भागच झाकला जाईल.

कुठे दिसणार सूर्यग्रहण

अंटार्क्टिका व्यतिरिक्त अटलांटिक प्रदेश, प्रशांत महासागर आणि दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण-पश्चिम भागात दिसणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे या ग्रहणाचा भारतावर कुठलाही धार्मिक प्रभाव नसेल शिवाय पूजेत देखील कोणत्याही निर्बंधांचा विचार केला जाणार नाही.

हे सुद्धा वाचा

सुतक काळ

सूर्यग्रहण सुरु व्हायच्या 12 तास आधी सुतक काळ असतो. धार्मिक मान्यतेनुसार सुतक काळात कोणतंही शुभ किंवा मांगलिक कार्य केलं जात नाही. भारतात हे सूर्य ग्रहण नसल्यामुळे इथे सुतक काळ वैध ठरला जात नाही.

आंशिक सूर्यग्रहण 2022

नासाच्या मते, जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि पृथ्वीवर सावली टाकतो तेव्हा सूर्यग्रहण होतं. चंद्र मध्ये आल्यामुळे अर्थातच सूर्य अंशतः झाकला जातो.आंशिक ग्रहण काळात सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही. सूर्य अर्ध चंद्राकृती आकारात दिसतो. आंशिक ग्रहणामुळे चंद्र, सूर्य आणि पृथ्वी सरळ रेषेत नसतील. चंद्र आपल्या सावलीचा फक्त बाह्य भाग सूर्यावर टाकेल, ज्याला उप- सावली देखील म्हटलं जातं

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.