AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur: चंद्रपूर महापालिकेत मोठा ट्विस्ट, उद्धव सेना भाजपसोबत जाणार? महापौर पदाचा काय ठरला फॉर्म्युला?

Chandrapur Municipal Corporation Mayor: चंद्रपूर महानगरपालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. काँग्रेसमधील दुफळीचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. भाजपने उद्धव ठाकरे शिवसेनेसमोर मोठा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे संख्याबळ असूनही इथं काँग्रेस वंचित राहण्याची शक्यता आहे. काय आहे ती मोठी अपडेट?

Chandrapur: चंद्रपूर महापालिकेत मोठा ट्विस्ट, उद्धव सेना भाजपसोबत जाणार? महापौर पदाचा काय ठरला फॉर्म्युला?
चंद्रपूर महानगरपालिका महापौर उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Feb 04, 2026 | 11:02 AM
Share

Chandrapur Municipal Corporation Mayor: चंद्रपूर काँग्रेसमधील शिमगा संपलेला नाही. विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील कलगीतुरा पार दिल्लीपर्यंत जाऊनही संपलेला नाही. काँग्रेसमधील या दुहीचा फायदा भाजपला होण्याची शक्यता दिसत आहे. भाजपने उद्धव ठाकरे शिवसेनेसमोर मोठा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे संख्याबळ असूनही काँग्रेस महानगरापालिकेत सत्तेपासून दूर राहण्याची शक्यता आहे. उद्धव सेना इथं किंगमेकर आहे. त्यामुळे ठाकरे सेनेने जर मनावर घेतलं तर भाजपचा महापौर होऊ शकतो. काय आहे तो फॉर्म्युला?

भाजप-उद्धव सेनेचा सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला

चंद्रपूरमध्ये महापौर पदाचा पेच सोडवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाला सव्वा-सव्वा वर्षांचा महापौर करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे, अशी माहिती भाजपमधील वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे. ठाकरे सेना महापौर पद मिळण्याबाबत आग्रही असल्यामुळे आता भाजपाकडून शिवसेनेला नवीन प्रस्ताव देण्यात आला आहे. दोन्ही पक्ष पहिल्या अडीच वर्षांसाठी सव्वा-सव्वा वर्ष विभागून घेणार महापौर पद मात्र आधी कोणाचा महापौर होणार यावर चर्चा सुरू असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे.

तर दुसरीकडे भाजपकडून या प्रकारचा अधिकृत प्रस्ताव आला नसल्याची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांनी माहिती दिली. मात्र अशा प्रकारचा प्रस्ताव आल्यास विचार करू असे मोठे वक्तव्य संदीप गिर्हे यांनी केले आहे. तर खासदार संजय राऊत यांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत असा दावा फेटाळला आहे. भाजपसोबत न जाण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता भाजप कोणती चाल खेळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महापौर-उपमहापौर निवडणूक 10 फेब्रुवारीला

चंद्रपूर शहर मनपा महापौर-उपमहापौर निवडणूक 10 फेब्रुवारीला होणार आहे. 5 फेब्रुवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत चंद्रपूर शहर मनपा नगर सचिवांच्या कार्यालयातून 10 उमेदवारी अर्जांची उचल झाली आहे. सर्वाधिक 8 अर्ज भाजप गोटातून नेले असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. तर 2 अर्ज काँग्रेस गटाकडून उचलले गेले आहेत. 5 फेब्रुवारीला दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरता येणार असून अर्ज भरतेवेळी महापौर पदाचा उमेदवार आणि सूचक व अनुमोदक स्वतः उपस्थित राहण्याची अट आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील सत्तेचा तिढा गुंतत चालला असताना कोणते पक्ष, कोणते गट, महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; मोठा निर्णय होणार?
CJP | मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; अभिजीत दिपकेंच्या निवासस्थानी बैठक; मोठा निर्णय होणार?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! खांदेपालटचा इशारा
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! त्या मंत्र्यांना घरी पाठवणार? खांदेपालटचा इशारा
मन हेलावणारी बातमी! बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
मन हेलावणारी बातमी! लगान ते गजनी... बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?