AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lucknow News : 3 पिस्तुल, 3 मृत्यू आणि डोक्यात गोळी.. लखनऊ हत्याकाडांची Inside Story

लखनऊमध्ये बँक ऑफीसर दिव्या मिश्राची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर तिचा पती मानसने त्याच्या बहिणीवरही गोळ्या झाडल्या, एवढंच नव्हे तर त्याने स्वत:चंही जीवन संपवलं. पोलिसांना तीन पिस्तुलं मिळाली असून तीनही मृतांच्या डोक्यात गोळी लागल्याचं समोर आलंय.

Lucknow News : 3 पिस्तुल, 3 मृत्यू आणि डोक्यात गोळी.. लखनऊ हत्याकाडांची Inside Story
लखनमध्ये हादरवणारं हत्याकांड
| Updated on: Aug 20, 2026 | 4:37 PM
Share

Lucknow News : लखनऊच्या गोमतीनगरमध्ये गुरूवारी सकाळी झालेल्या थरारक हत्याकांडामुळे प्रचंड खळबळ माजलेली असतानाच पोलिस मात्र हैराण झाले आहेत, या हत्याकांडामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.  शहरातील आयसीआयसीआय बँकेबाहेर रिलेशनशिप मॅनेजर दिव्या मिश्रा हिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही हत्या त्या महिलेचा पती मानस याने केली असावी असा पोलिसांना संशय होता. हत्येनंतर मानस हा त्याच्या घरी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली, तिथे जाऊन त्याने बहिणीवरही गोळ्या झाडल्या आणि स्वत:लाही गोळी मारून घेतल्याचे समोर आलं. या भयानक हत्याकांडात तिघांचा जी गेला.

तीन पिस्तुलांमुळे गूढ वाढले; पत्नी, बहिणीनंतर मानसनेही स्वत:चाही घेतला जीव

या दुहेरी हत्याकांडानंतर सर्वात मोठा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला आहे तो म्हणजे घटनास्थळी सापडलेल्या तीन पिस्तुलांचा. तिन्ही मृतांच्या डोक्यात गोळी लागल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. त्यामुळे मानसने पत्नी आणि बहिणीची हत्या करण्यासाठी वेगवेगळ्या पिस्तुलांचा वापर केला आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडली का, की या घटनेमागे आणखी काही वेगळी कहाणी आहे, याचा तपास पोलीसांकडून करण्यात येत आहे. फॉरेन्सिक तपासणी आणि शवविच्छेदन अहवालातून या प्रकरणातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे.

बँकेबाहेर पत्नीला बोलावलं आणि..

दिव्या मिश्रा या ICICI बँकेत कार्यरत होत्या आणि आलमबाग परिसरात राहत होत्या. गुरुवारी दुपारी त्यांचे पती मानस यांनी त्यांना फोन केला आणि बँकेबाहेर भेटण्यासाठी बोलावलं. दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली. त्यानंतर अचानक गोळीबाराचा आवाज आला. प्राथमिक माहितीनुसार, मानसने दिव्या यांच्यावर गोळी झाडली. गोळी लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. बँकेतील कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

पती-पत्नीत सुरू होता वाद

मानस आणि दिव्या यांच्या वैवाहिक नात्यात दीर्घकाळापासून तणाव होता, असं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे. दोघांमधील वाद वाढल्यानंतर दिव्या यांनी सुमारे वर्षभरापूर्वी पतीपासून घटस्फोटासाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यामुळेच घटस्फोटाचं प्रकरण, दोघांमधील वाद आणि घटनेपूर्वी झालेला संवाद या सर्व बाबींचा तपास पोलीसांकडून केला जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच हत्येमागील नेमकं कारण स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं.

पत्नीला गोळी मारल्यानंर बहिणीलाही संपवलं

पत्नी दिव्या हिच्यावर गोळी झाडल्यानंतर, मानस हा हुसेडिया चौराह्याजवळील आपल्या घरी गेला. तिथे जाऊन त्याने त्याच्या बहिणीवरही गोळी झाडल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नव्हे तर त्यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत पत्नी आणि बहिणीचा मृत्यू झाला असून मानसचाही मृत्यू झाला आहे. मात्र, तिहेरी हत्याकांडाचा हाँ घटनाक्रम नेमका कसा घडला, याची प्रत्येक कडी जोडण्याचं काम पोलीस करत आहेत.

3 पिस्तुलांनी वाढवलं रहस्य

दरम्यान, घटनास्थळावरून तीन पिस्तुलं सापडल्याने या प्रकरणाचं गूढ आणखी वाढलं आहे. त्या तीनही शस्त्रांमधून गोळीबार झाला होता का, त्यापैकी कोणत्या पिस्तुलाचा कुठे वापर झाला आणि काही शस्त्रं केवळ घटनास्थळी ठेवण्यात आली होती का, हेही पोलीस तपासून पहात आहेत. तसेच ही पिस्तुलं कोणाच्या नावावर आहेत, ती मानसपर्यंत कशी पोहोचली आणि त्याच्याकडे ती कायदेशीररीत्या होती का, याचीही चौकशी केली जात आहे. फॉरेन्सिक पथकाने ती शस्त्रं, गोळ्या आणि घटनास्थळावरील इतर पुरावे तपासण्यास सुरुवात केली आहे.

व्हॉट्सॲप स्टेटसमधूनही महत्वाचा पुरावा

या घटनेनंतर मानसच्या व्हॉट्सॲप स्टेटसबद्दलही माहिती समोर आली आहे. या स्टेटसमध्ये त्याने पत्नीच्या हत्येचा दावा केल्याचे सांगितले जात असून, त्यात कौटुंबिक नातेसंबंध आणि विश्वासघाताचाही उल्लेख होता असं समजतं. हे स्टेटस प्रत्यक्षात मानसनेच पोस्ट केलं होतं का, ते कधी पोस्ट करण्यात आलं आणि त्यातील मजकुराचा या घटनेशी नेमका काय संबंध आहे, याची पडताळणी पोलीस करत आहेत.

सीसीटीव्ही आणि फॉरेन्सिक तपासावर नजर

या भयानक हत्याकांडाचा संपूर्ण घटनाक्रम समजून घेण्यासाठी पोलीसांकडून बँक परिसरातील आणि आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. मानस बँकेबाहेर नेमका कधी आला, दिव्या यांच्याशी त्याची किती वेळ चर्चा झाली आणि गोळीबारानंतर तो कोणत्या मार्गाने निघून गेला, याचाही शोध घेतला जात आहे. तसेच घटनास्थळावरून मिळालेले फिंगरप्रिंट, गोळ्या, शस्त्रे आणि इतर फॉरेन्सिक पुराव्यांची तपासणी केली जात आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात