
लुधियानाहून दिल्लीला जाणाऱ्या अमृतसर–सहरसा गरीब रथ एक्सप्रेस ट्रेनला (नंबर – 12204) शनिवारी सकाळी सरहिंद रेल्वे स्टेशनजवळ आग लागली. ट्रेनने सरहिंद स्टेशन सोडून अर्ध्या किलोमीटर अंतरावर जाताच एका कोचमधून धुर येत असल्याच प्रवाशांनी पाहिलं. तात्काळ ट्रेन थांबवून रेल्वे कर्मचाऱ्यांनी मदत कार्य सुरु केलं. माहिती मिळताच, पोलीस आणि रेल्वेची टीम घटनास्थळी पोहोचली, असं स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. प्रवाशांना सुरक्षितरित्या शिफ्ट करण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की, परिस्थिती आता नियंत्रणात असून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. एका महिला प्रवासी जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ही घटना सकाळी 7.30 च्या सुमारास झाली. आगीची माहिती मिळताच, तात्काळ रेल्वे कर्मचाऱ्यांनी पावलं उचलली. आग लागलेला डब्बा तात्काळ रिकामी केला. फायर टीमच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवलं. आग मर्यादीत भागात लागेलली. म्हणून तात्काळ विझवण्यात आली.या आगीत तीन डब्बे जळून खाक झाले आहेत.
रेल्वेने काय म्हटलय?
रेल्वेने आपल्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की, “अमृतसर-सहरसा गरीब रथ एक्सप्रेसच्या (12204) एका डब्ब्यात सरहिंद स्टेशन जवळ आग लागल्याच लक्षात आलं. रेलवे अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रवाशांना दुसर्या कोचमध्ये शिफ्ट केलं आणि आग विझवली. कुठल्याही प्रवाशाचं काही नुकसान झालेलं नाही. ट्रेन लवकरच आपल्या इच्छित स्थानकाच्या दिशेने रवाना होईल”
रेल्वे आणि पोलिसांच्या टीम्स घटनास्थळी
सध्या आग का लागली? या कारणांची चौकशी केली जात आहे. रेल्वे आणि पोलिसांच्या टीम्स घटनास्थळी आहेत. ट्रॅक पुन्हा सुरु करण्याची प्रक्रिया सुरु आहे. थोड्यावेळाने पुन्हा ट्रेन रवाना करण्याची तयारी सुरु आहे.