दोघांपासून तिचं मन नाही भरलं, मग तिसरा पुरुष.. यात एक संपला, मुलाच्या पुस्तकाने समोर आणला रीनाचा खतरनाक चेहरा

त्याचवेळी तिच्या आयुष्यात दुसरा प्रियकर वीरु जाटची एन्ट्री झाली. राजस्थानचा वीरु रीनाच्या रील्सवर कमेंट करायचा. हळूहळू ही डिजिटल जवळीक प्रेमात बदलली. वीरु नरसिंहपूरला येऊ-जाऊ लागला.

दोघांपासून तिचं मन नाही भरलं, मग तिसरा पुरुष.. यात एक संपला, मुलाच्या पुस्तकाने समोर आणला रीनाचा खतरनाक चेहरा
reena kirar
| Updated on: May 16, 2026 | 2:05 PM

मागच्यावर्षी इंदोरच्या सोनम रघुवंशीने देशाला हादरवून सोडलं होतं. आता सोनमपेक्षा पण जास्त चर्चा रीना किरारची आहे. सोशल मीडियावर ग्लॅमरस रील्स बनवणाऱ्या रीनाचं वास्तव हे कुठल्या डार्क थ्रिलर चित्रपटापेक्षा कमी नाही. वयाच्या 16 व्या वर्षी सुरु झालेली सामान्य मुलीची गोष्ट लग्जरी लाइफ, दोन प्रियकर त्यातून एक भयानक हत्याकांड अशी आहे. रायसेन पोलिसांनी जेव्हा गुन्ह्याची उकल केली, तेव्हा ते सुन्न झाले. रीनाचा जन्म नरसिंहपूर जिल्ह्याच्या साईंखेडा या छोट्याशा गावात झाला. जन्माआधीच वडिलांचा मृत्यू झाला. काही महिन्यात आई सोडून गेली. मावशीने तिला लहानाचं मोठ केलं. तिची स्वप्न खूप मोठी होती. गावात राहणाऱ्या अरुण पटेलच्या ती प्रेमात पडली. बदनामीच्या भितीने नातेवाईकांनी वयाच्या 16 व्या वर्षीच तिचं लग्न लावून दिलं.

रीनाच्या लग्नाला 13 वर्ष झाली. तिला एक मूल झालं. पण रीनाने मनापासून पतीला स्वीकारालच नव्हतं. ती पुन्हा तिचा जुना प्रियकर अरुणकडे आली. अरुणने रीनावर पैशांचा पाऊस पाडला. रोतारात तिचं आयुष्य बदलून गेलं. रीना आपल्या आयुष्यातील ऐशोआराम रील्स मधून दाखवू लागली. सोशल मीडियावर ती खूप सक्रीय होती. त्याचवेळी तिच्या आयुष्यात दुसरा प्रियकर वीरु जाटची एन्ट्री झाली. राजस्थानचा वीरु रीनाच्या रील्सवर कमेंट करायचा. हळूहळू ही डिजिटल जवळीक प्रेमात बदलली. वीरु नरसिंहपूरला येऊ-जाऊ लागला.

कॉपीवर शाळेतील शिक्षकाची स्वाक्षरी

पण यामध्ये एकाचा मृत्यू झाला. वीरु जाटची हत्या झाली. पूर्ण प्लानिंग करुन ही मर्डर करण्यात आली. वीरुचा मृतदेह 7 मे रोजी रायसेन जिल्ह्यात बंद गोणीत सापडला. हात बांधलेले होते. तोंडला चिकटपट्टी होती. मृतदेहाजवळ एक बॅग सापडली. यात एका मुलाची रफ कॉपी होती. या कॉपीमुळे पोलिसांना संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करता आला. कॉपीवर शाळेतील शिक्षकाची स्वाक्षरी होती. पोलीस तपास करत, करत, नरसिंहपुर जिल्ह्याच्या साईंखेडा गावात पोहोचले. त्यावेळी समजलं की ती कॉपी रीना किरारच्या मुलाची आहे.

कॉपीने सर्व सत्य समोर आलं

रीनाने वीरुला भेटण्याच्या बहाण्याने तिच्या घरी बोलावलं. तिथे अरुण आणि त्याचा साथीदार आधीपासूनच होते. वीरुवर बेस बॉलच्या बॅटने हल्ला केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. मृतदेह गोणीत भरला. पण त्यात मुलाची बॅग सुद्धा होती. त्यामुळेच पोलीस गुन्हेगारांपर्यंत पोहोचले. हत्येनंतर मृतदेह रायसेन येथे घेऊन गेले व एका पुलावरुन 40 फूट खाली फेकला. पण एका मुलाच्या कॉपीने सर्व सत्य समोर आलं.

Follow Us