AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Trisha Krishnan: त्रिशावर अश्लील टिप्पणी करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांना कोर्टाकडून मोठा दिलासा

अभिनेत्री त्रिशा कृष्णनबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्यानंतर तमिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरसभेत त्यांनी त्रिशावर दुहेरी अर्थाने अश्लील टिप्पणी केली होती.

Trisha Krishnan: त्रिशावर अश्लील टिप्पणी करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांना कोर्टाकडून मोठा दिलासा
उदयनिधी स्टॅलिन, त्रिशा कृष्णनImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 04, 2026 | 3:31 PM
Share

तमिळनाडूचे विरोधी पक्षनेते आणि डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन यांना आज (4 ऑगस्ट 2026) सकाळी तंजावर पोलिसांच्या पथकाने त्यांच्या निवासस्थानातून अटक केली. तंजावरमधल्या एका सभेत त्यांनी अभिनेत्री त्रिशा कृष्णनबद्दल आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने उदयनिधी स्टॅलिन यांना पोलीस तपासात सहकार्य करण्याचे आणि चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचसोबत चौकशी पूर्ण झाल्यावर त्यांना सोडण्याचे निर्देशही न्यायालयाने पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. टीव्हीकेनं दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर उदयनिधी यांना अटक केली होती. त्याच्याविरोधातील एफआयआरमध्ये महिलेचा छळ, द्वेषपूर्ण भाषण, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या इतर संबंधित तरतुदींचा समावेश आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

उदयनिधी स्टॅलिन हे कावेरी पाणीप्रश्नावरून आयोजित आंदोलनाचं नेतृत्व करत होते. यावेळी भाषणादरम्यान त्यांनी आधी तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यावर निशाणा साधला. तेव्हा गर्दीतून ‘त्रिशा, त्रिशा’ अशी घोषणाबाजी झाली. हे ऐकून उदयनिधी हसले आणि म्हणाले, “पाणी इतरत्र कुठे पोहोचू दे किंवा न पोहोचू दे.. पण तिथे मात्र पोहोचलं पाहिजे.” यानंतर त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, “मी कावेरीबद्दल बोलत होतो.” त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.

उदयनिधी स्टॅलिन यांचा हा व्हिडीओ व्हायरल होताच सर्वच स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अभिनेत्री त्रिशा कृष्णनवर त्यांनी दुहेरी अर्थाने अत्यंत अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप टीव्हीकेनं केला आणि त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. तर भाजपकडूनही उदयनिधी यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. टीव्हीकेनं याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडेही धाव घेतली आहे.

स्टॅलिन यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यांना ताब्यात घेताना त्याठिकाणी बराच गोंधळ निर्माण झाला होता. ताब्यात घेतल्यानंतर उदयनिधी यांनी, “मी काय चुकीचं म्हटलं आहे? मी मुख्यमंत्र्यांशिवाय कोणाचंही नाव घेतलं नाही” असं म्हणत स्वत:चा बचाव केला. मी या अटकेच्या कारवाईकडे एक विनोद म्हणून पाहतो, असंही ते म्हणाले. अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी उदयनिधी यांनी मद्रास उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दुपारी 12 वाजेपर्यंत त्यांच्याविरोधात कोणतीही अटक कारवाई न करण्याचे निर्देशही दिले होते. असं असूनही पोलिसांनी कारवाई सुरूच ठेवली.

Follow Us
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC | तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन् फुल-घास चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं
शरद पवारांचं फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
Sharad Pawar | शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?